कोल्हापूर २६ मे २०१९ सिटी न्यूज़
रंकाळा - संध्यामठ परिसरात व्यापक स्वच्छता मोहिम - मनपा - विहीप - सह विविध संस्थाचा सहभाग
कोल्हापूर :
करवीर पंचक्रोशीचा डायमंड समजला जाणाऱ्या रंकाळा तलावातील संध्या मठ परिसराची स्वच्छता गाळ - दगड - खरमती तसेच प्लास्टिक पिशव्या बॉटल्स निर्माल्य व बाहेर काढून स्वच्छता करताना रंकाळा पर्यावरण प्रेमी नागरिक व विविध संघटना तर्फे ही मोहीम राबवण्यात आली महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने या उपक्रमात विश्व हिंदू परिषद - बंजरंग दल - दुर्गा वाहिनी - जिजाऊ ब्रिगेड सह स्थानिक न्यू संध्या मठ तरूण मंडळ -शिवसेना शाखा तसेच नगरसेवक ब्रोद्रे मित्रपरिवार सहभागी झाला होता . पहाटे सहा पासून अकरा पर्यत ही मोहीम राबविण्यात आली , यात टप्या - टप्याने दोनशे कार्यकर्ते सहभागी झाले होते ... त्यांनी सात डंपर रंकाळ्यातील गाळ - खर माती - प्लॅस्टीक काढण्यात साठी श्रमदानातून स्वप्रेरणेने लोकांचा उस्फुर्त प्रतिसाद दिला . जल प्रदूषण मुक्ती साठी संकल्पही यावेळी करण्यात आला रंकाळ्यातील पाणी प्रदूषणामुळे जलचरांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता व संपूर्ण कोल्हापुरात दुर्गंधीयुक्त वास व कीटकांचा त्रास नागरिकांना होत असतो आता पुढेही ही मोहीम यशस्वी करण्यासाठी लोक चळवळीची गरज आहे तरी सर्वांनी एक होऊन पर्यावरणाचे रंकाळ्याचे संवर्धन व संगोपन करण्याचा निर्धार यावेळी घेण्यात आला पुढील वेळी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री अड .रणजितसिंह घाटगे यांनी केले . यावेळी विहीप सोशल मिडिया समन्वयक - पत्रकार राजेंद्र मकोटे यांचा वाढदिवस पर्यावरण पूरक पद्धतीने करण्यात आला त्यांना रोपटे देऊन वृक्षसंवर्धनाचा संगोपन करण्याचे निर्धार करण्यात आला. यावेळी स्थानिक नगरसेवक इंद्रजित बोंद्रे यांनी मित्र परिवारासह सहभागी होत सर्वासाठी नाष्टा व्यवस्थाही केली . या वेळी रास पचे डॉ . संदेश कचरे सह लहुजी - परिवर्तन संघटनेचे अमोल कुरणे, अक्षय साळवे , शाहीर राजू राऊत ,अमर जाधव स्थानिक राजु साळोखे , निसर्ग फोटोग्राफर साळवी , संजय नडद गल्ली सह गत आठवडयात विहिप आयोजि मुर्ती अभ्यासक उमाकांत रांणि गा , बंडा पेडणेकर , शाहीर राजु राऊत यांचे रंकाळा परिसंवादात सहभागी झालेले रंकाळा प्रेमी सह नंदवाळ , गोकुळ शिरगांव , कणेरी , कंळबा येथून आलेले निसर्ग प्रेमी सह विविध क्षेत्रातील मान्यवरानी श्रमदान केले .




Comments
Post a Comment