ज्येष्ठ लेखिका जयश्री दानवेंच्या ‘अद्वितीय’ पुस्तकाला
‘ अंकुर साहित्य पुरस्कार ’ जाहीर
कोल्हापूर ३० :महाराष्ट्र साहित्य क्षेत्रात कार्यरत, सर्वांचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या अंकुर साहित्य संघाचे ५७ वे दोन दिवसीय अखिल भारतीय अंकुर मराठी साहित्य संमेलन मुक्ताईनगर,
जि.जळगांव येथे दि.६ व ७ जून २०१९ रोजी आयोजित केले आहे.या साहित्य संमेलनात नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या कन्या ज्येष्ठ लेखिका जयश्री दानवे यांच्या
‘अद्वितीय’- (वादक-नर्तक) या पुस्तकाला पुरस्कृत करण्यात येणार आहे. हे पुस्तक म्हणजे भारतीय वादनविश्वाची ललितरम्य ओळख आहे.या पुस्तकात भारतीय वादक आणि नर्तक पं.रविशंकर,पं.बिरजू महाराज,उस्ताद झाकीर हुसेन,उस्ताद अमजद अली खां,
रोहिणी भाटे,बिस्मिल्ला खां,पं.हरिप्रसाद चौरसिया,गोविंदराव टेंबे,पं.पन्नालाल घोष अशा अनेक २८ कलाकारांची सांगीतिक ओळख आहे.
संमेलनाचे उदघाटन माजी महसूल मंत्री श्री.एकनाथ खडसे यांचे शुभहस्ते होणार असून सुप्रसिद्ध गीतकार प्रवीण दवणे,प्रसिद्ध कवी ज्ञानेश वाकुडकर आदी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान संपन्न होणार आहे.जयश्री दानवे यांच्या ‘हिरवी चादर रुपेरी पडदा’ या आत्मचरित्रास दोन पुरस्कार,‘कलायात्री’ चरित्रग्रंथास दहा पुरस्कार,‘स्पंदन’ कथासंग्रहास बालरंजन व करवीर साहित्य परिषद असे दोन पुरस्कार,
‘सहित्यिक मानदंड’ या व्यक्तीचित्रणाला नलगे पुरस्कार,‘सांगीतिक दीपस्तंभ’ या व्यक्तीचित्रणास द.म.सा.पुरस्कार,‘दरवळ’ कथासंग्रहास बालरंजन पुरस्कार,‘जंगल बुक’ या कथासंग्रहास शब्दरत्न पुरस्कार अशा अनेक पुस्तकांना पुरस्कारांनी सन्मानित केले असून आता ‘अद्वितीय’ (वादक-नर्तक) व्यक्तीचित्रणाला अंकुर साहित्य पुरस्कार प्राप्त होणार आहे.त्यांची आजवर २५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Comments
Post a Comment