सिटी राजकीय
वैशिष्ट्ये :
नमो पर्व : २ सुरु
नवी दिल्ली ३१ :नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान
- ठळक घडामोडी
- दिग्गजांच्या उपस्थितीत राष्ट्रपती भवन परिसरात शपथविधी सोहळा संपन्न.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवार (दि.30) रोजी दुसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मोदींना पद आणि गोपनियतेची शपथ देण्यात आली.
- या सोहळ्याला राहुल गांधी, सोनिया गांधी,मनमोहन सिंग,अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, उद्धव ठाकरे, मुकेश अंबानी, रजनीकांत, कमल हासन, कंगना रणौत, शाहरूख खान यांच्यासह अनेक दिग्गज शपथविधीस उपस्थित होते.
- कॅबिनेट मंत्र्यांची नावे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राजनाथ सिंह, नितीन गडकरी, अमित शहा, पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर, डॉ. हर्षवर्धन, स्मृती इराणी, रामविलास पासवान, निर्मला सीतारमण, डी. व्ही. सदानंद गौडा, गजेंद्रसिंह शेखावत, गिरीराज सिंह, अरविंद सावंत, महेंद्रनाथ पांडेय, प्रल्हाद जोशी, मुख्तार अब्बास नकवी, धमेंद्र प्रधान, अर्जुन मुंडा, रमेश पोखरियाल निशंक, एस. जयशंकर, थावरचंद गेहलोत, हरसिमरतकौर बादल, रवीशंकर प्रसाद, नरेंद्रसिंह तोमर.
- बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ, भूतान यासह इतर देशांतील दिग्गज उपस्थित.
- या सोहळ्यासाठी तब्बल सहा हजार पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आलं.
- ▪यंदाच्या शपथविधीला पाकिस्तानच्या नेत्यांना वगळण्यात आले आहे.
Comments
Post a Comment