सिटी विशेष
सामान्य माणसाचा असामान्य "प्रताप "
एक सामान्य माणूस काय करू शकतो आणि जनता जनार्दन कशी त्याला रंकाचा राजा करते , याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ओरिसाचे 'प्रतापचंद्र सारंगी'. यांना काल मोदी सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्री पद दिलं गेलंय. सगळ्यात गरीब खासदार आहेत ते. वैयक्तिक संपत्ती केवळ दीड एक लाख. निवडणुक प्रचारावर पैसा खर्च न करता केवळ सायकलवरून प्रचार केला. बिजू जनता दलाचे रवींद्रकुमार जेना या करोडपती उमेदवाराला चारिमुंडयाचीत करत बालासोरमधून निवडून आले. याचं कारण म्हणजे त्यांचं सामाजिक कार्य. साधू बनायला निघालेला हा माणूस आपल्या विधवा आईच्या आर्जवामुळे परत आला. लग्न न करता आयुष्य समाजसेवेत झोकून दिलं. बालासोर आणि मयुरभंज या आदिवासी भागात अनेक शाळा सुरू केल्या. सतत कार्यमग्न असणाऱ्या या व्यक्तीचा घरोघरी संपर्क दांडगा आहे.
निवडणुक जिंकण्यासाठी फ़क्त पैसा लागत नाही तर जनतेच्या मनातील कप्प्यात घर असाव लागते

Comments
Post a Comment