भगिनी महोत्सव २०१९

भगिनी महोत्सव  २०१९ 

भगिनी पुरस्कार आणि बक्षीस वितरण समारंभाने होणार भगिनी महोत्सावाची सांगता
महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी रविवार दि. १२ मे २०१९ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी २.०० या वेळेमध्ये महिलांच्या पारंपारिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये झिम्मा – फुगडी, उखाणे, घागर घुमविणे, सूप नाचविणे या स्पर्धां पार पडणार आहेत. यातील विजेत्या महिलांनाही आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर विविध पारंपारिक खेळामध्ये सहभागी होऊन आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी महिलांना मिळणार आहे.

यानंतर महोत्सवाच्या सांगता समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. महिलांच्या ध्येय निश्चिती करिता, विविध क्षेत्रामध्ये गगन भरारी घेण्याकरिता एक आदरणीय व्यक्तीचे अनुकरण त्यांनी करावे, याच प्रयत्नातून सामाजिक क्षेत्रामध्ये केलेल्या अमूल्य कार्याचा आढावा घेत पाच महिला भगिनींना “भगिनी पुरस्कार २०१९” ने सन्मानित करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय ख्याती मिळविलेल्या सिने, क्रीडा, सामाजिक आणि चळवळीतील महिलांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप रोख रु.११ हजार, मानपत्र, भगवा फेटा, शाल- श्रीफळ असे असणार असून, या पुरस्काराचे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. मा. चंद्रकांतदादा पाटील, गृहराज्यमंत्री नाम. मा. दीपक केसरकर यांच्या हस्ते  कोल्हापूरच्या महापौर सौ. सरिता मोरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. यानंतर तीन दिवस चाललेल्या या महोत्सवामध्ये विजेत्या ठरलेलेया विजेत्यांना आकर्षक किमती बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. यानंतर सायंकाळी ७.०० वाजता महाराष्ट्राच्या लोककला आणि संस्कृती वर आधारित “रंग लोककलेचा” या कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता होणार आहे.


Comments