सिटी राजकीय न्यूज़

सिटी राजकीय  न्यूज़ 
  लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व विजयाबद्दल आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले मुख्यमंत्री नाम. देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन 




मुंबई दि.२९ : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीचे कल हाती आले असून केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार बहुमताने सत्तेत आलं आहे. एकीकडे केंद्रात भाजपा सरकार येणार की काँग्रेसला सत्ता मिळणार याची उत्सुकता असताना महाराष्ट्रात मतदारांनी काय कौल दिला आहे याकडेही अनेकांच्या नजरा होत्या. महाराष्ट्रातही शिवसेना – भाजपा युतीला प्रचंड बहुमत मिळाले आहे. महाराष्ट्रात विरोधक भुईसपाट झाले असून, महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी तब्बल ४१ जागांवर शिवसेना – भाजप युतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. या अभूतपूर्व यशाबद्दल काल मुंबई येथे आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धवजी ठाकरे यांची “मातोश्री” येथे भेट घेवून आशीर्वाद घेतले व विजयाच्या शुभेच्छ्या दिल्या. यासह मुख्यमंत्री नाम.श्री. देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेवून त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी, लोकसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना भाजपने एकत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. शिवसेना व भाजपसह मित्र पक्ष यांनी एकत्र प्रचार करत राज्यातील ४८ पैकी ४१ जागांवर विजय मिळवला. हा विजय ऐतिहासिक विजय असून केंद्रात पुन्हा मोदी पंतप्रधान होणार आहेत. तर आगामी निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख वंदनीय उद्धवजी ठाकरे आणि आपल्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात पुन्हा युतीची सत्ता येईल यात काडीमात्र शंका नसल्याचे सांगितले.

यासह कोल्हापूरच्या लोकसभेच्या दोन्ही जागांवरील विजय हा विधानसभेच्या विजयाची नांदी आहे. युतीच्या विजयात शिवसेना, भाजप महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केलेले कष्ट हे या विजयाचे फळ आहे. आई अंबाबाईच्या करवीरनगरीतील शिवसेनेचा खासदार व्हावा, हि शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्णत्वास आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही खासदार युतीचे झाल्याने संपूर्ण जिल्हा शिवसेना भाजप युतीमय झाला आहे. युतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनखाली येत्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना – भाजप महायुतीचे दहा आमदार निवडून आणू आणि पुन्हा महाराष्ट्रात युतीचे सरकार आणण्याचा निश्चय सर्वांनी केला असल्याचे सांगितले. त्यामुळे आगामी काळात कोल्हापूर शहरातील प्रलंबित प्रश्न आणि विकास कामे मार्गी लावण्यासाठी जातीने लक्ष घालवे, अशी मागणीही आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 

Comments