भगिनी महोत्सव २०१९
भगिनी महोत्सवाचा दुसरा दिवस
बचत गटांच्या खाद्यमहोत्सवात खवय्यांची गर्दी
कोल्हापूर दि.११ : दिलखेचक नृत्य, धमाल विनोदी अभिनय आणि सुरेल गायकी अशा तिहेरी मनोरंजनाचा आस्वाद देत कोल्हापूर वासियांना मंत्रमुग्ध करीत भगिनी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सिने कलाकारांनी धुमधडाक्यात आपली कला सादर केली. गेल्या सात वर्षापासून कोल्हापूर वासीयांच्या मनामध्ये घर करून बसलेला कोल्हापूरचा महोत्सव “भगिनी महोत्सव”. आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशन संचालित भगिनी मंचच्या वतीने सलग ९ व्या वर्षी त्याच रंगात आणि त्याच जल्लोषात “भगिनी महोत्सव २०१९” चे भव्य आयोजन “प्रायव्हेट हायस्कूल मैदान” मंगळवार पेठ कोल्हापूर येथे करण्यात आले आहे.
भगिनी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी १०.०० ते २.०० या वेळेमध्ये टीव्ही कलाकार योगेश सुपेकर यांच्या “वहिनी सरकार” या महिलांच्या स्पर्धात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या स्पर्धेमध्ये संगीत खुर्ची, बॉल- बकेट, ग्लास आणि प्लेट चा मनोरा उभा करणे अशा स्पॉट गेम मधून पहिल्या दहा स्वर्धाकांची निवड करण्यात आली. या दहा स्पर्धकांमध्ये झालेल्या अंतिम फेरीत सौ.पल्लवी किरण पोवार या सर्व स्पर्धकांवर मात करीत वहिनी सरकार स्पर्धेच्या विजेत्या ठरल्या. त्याच बरोबर स्पर्धेतील विजेत्या असणाऱ्या स्पर्धाकासाठी असणाऱ्या प्रथम क्रमांकाच्या बक्षीस एलसीडी टीव्ही च्या मानकरीही झाल्या. या स्पर्धेमध्ये द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेल्या स्पर्धक अनुक्रमे कविता संजय पाटील व शोभा विजय गायकवाड या मानकरी ठरल्या. या पहिल्या तीन विजेत्या स्पर्धकाना अनुक्रमे एल.सी.डी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन अशी भरगोस बक्षिसे दिली जाणार आहेत. तर चार ते दहा क्रमांकाच्या विजेत्या अनुक्रमे साक्षी पाटील, गीता भंडारी, सविता सोलापुरे, ज्योती दीपक माळी, श्रुती नितीन गोरल, ज्योती सचिन खटावकर, नीलम सुरेश बनछोडे याना टोस्टर बक्षीस देवून गौरविण्यात येणार आहे. .

Comments
Post a Comment