सिटी न्यूज़
दि:१७ मे २०१९
कोल्हापूर शहर वार्ता
शाहपुरी परिसर
- शाहूपूरी कुंभार गल्लीत दशभुजा गणेश दर्शन योग ::: पौराणिक आणि धार्मिक महत्व असलेल्या पुष्टपती विनायक जंयती निमित्त दशभुजा गणेश दर्शन भाविकाना शाहूपूरीतील गणेश मंदिरात शनिवार १८ मे रोजी पहाटे पाच पासून रौत्री बारा पर्यत घेता येणार आहे . याच दिवशी बुध्द पौर्णिमा - लक्ष्मी आणि राजयोग असा तिहेरी योग आलेला असल्याने येथे दर्शनासाठी होणारी भाविकाची गर्दी लक्षात घेऊन खास मंडप उभारणी करण्यात आली आहे .
- कोल्हापूरात झंकारणार स्वरझंकार
अभिजात भारतीय संगीताच्या प्रचार प्रसार कार्यात अग्रेसर असलेल्या पुण्यातील व्हॉयोलिन अकादमी तर्फे शनिवार दि.१८ मे रोजी स्वरझंकार संगीत महोत्सवाचे आजोजन केशवराव भोसले सभागृहात करण्यात आले आहे. कार्यक्रम रात्रौ ९.१० वाजता होणार असून त्यात रसिकांना गायन- वादन- नृत्य या सर्वांचा एकत्रित अविष्कार अनुभवायास मिळणार आहे, या मध्ये शमा भाटे ह्यांच्या शिष्या शीतल कोळवळकर ह्यांचा कथ्थक नृत्याविष्कार, पं जितेंद्र अभिषेकी ह्यांचे पुत्र व शिष्य शौनक अभिषेकी ह्यांचे गायन, पद्मश्री पं विजय घाटे ह्यांचे तबलावादन, तसेच जेष्ठ व्हॉयोलिन वादक पं. अतुलकुमार उपाध्ये ( व्हॉयोलिन) व लोकप्रिय सारंगीवादक उ. दिलशाद खान ह्यांची व्हॉयोलिन- सारंगी जुगलबंदीचा अनोखा अविष्कार रसिकांना अनुभवायास मिळणार आहे.
स्वरझंकारचे हे कोल्हापूरातील ८ वे वर्ष असून यात पं. शिवकुमार शर्मा (संतूर) हरिप्रसाद चौरसिया (बासरी), पं विश्वमोहन भट (मोहनविणा), ऊ.शाहिद परवेझ, (सतार), उ.राशीद खान, पंडिता कौशिकी चक्रवर्ती, बेगम परवीन सुलताना, पं राजन साजन मिश्रा ई अनेक दिग्गज लोकप्रिय कलाकारांच्या सुरेल अविष्काराची पर्वणी कोल्हापुरातील कानसेन गानरसिकाना दिली आहे.
VTP व PWC तसेच स्काय ने प्रायोजित केलेल्या या कार्यक्रमास वामन हरी पेठे, हॉटेल पर्ल , लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी, ओरलीकॉन बालझर्स , जाई काजल व रंगनाथ हॉस्पिटल ई. चे विशेष सहकार्य लाभले आहे.
कार्यक्रम सर्वांसाठी प्रवेश मोफत असून त्यांच्या मोफत प्रवेशिका वामन हरी पेठे येथे उपलब्ध असल्याचे संस्थेचे कोल्हापूरातील प्रवक्ते डॉ. प्रवीण हेंद्रे, श्रीमती कविता घाटगे ह्यांनी सांगितले.
अधिक माहितीसाठी संपर्क-
महाजन पब्लिसिटीचे गिरीश महाजन- . ९५६१६२६६६६
Comments
Post a Comment