संध्यामठाचे अनोखे पैलू ---- city news





काळा संध्यामठाचे अनोखे पैलू  आध्यात्मिक  - शाहीरी -  पक्षीमित्र अभ्यासकांच्या  माहिती मघून उलगडले   विहीप - शिवसेना शाखेवतीने थेट रंकाळा बेटावरच अनोखे आयोजन ..रविवारी सामुहीक श्रमदादानाचे आयोजन ...

कोल्हापूर: राजेंद्र मकोटे
          मावळत्या ताबुस रवीकिरणाच्या आणि घरट्याकडे परतीच्या प्रवासातील पक्षीविश्वाच्या साक्षीने रंकाळा तलावात   निर्माण झालेल्या बेटावरील हिरवळीवर  बसून संध्यामठ रंकाळा ची कोल्हापूरकरांसाठी प्राप्त करून दिली.  तिन्ही बाजूंनी रंकाळा तलावाचे पाणी असलेल्या संध्यामठ रंकाळा येथील हिरव्यागार बेटावर बसून संघी प्रकाशकाच्या समावेत ही रंकाळा तलावाची पूर्ण माहिती देण्यात आली.प्रांरभी सगळ्याचे स्वागत गुलाबाची फुले देऊन प्रा.रविंद्र साळोखे यांनी केले.समन्वयक विश्व हिंदू परिषदेचे सोशल मिडिया जिल्हा प्रमुख राजा मकोटे यांनी " अगदी अल्पालघीतच मिळालेला हा प्रतिसाद पाहून प्रतिवर्षी मे महिन्यातील संकष्टी दिनी याच जागेत यांचे आयोजन करण्याचा निश्चय जाहीर केला, त्यास सर्व रंकाळा - निसर्ग प्रेमीनी टाळ्या वाजवत दाद दिली.                       प्रांरभी गेली तीस वर्ष रंकाळा संवर्धन समितीच्या माघ्यमातून कार्यरत  मोरे यांनी रंकाळा तलाव परिसरातील विविध समस्याचा आढावा घेत त्या साठी वाढते जनमत गरजेचे गराजेचे आहे,आसे आग्रहाने सांगितले..  मंदिर व मूर्ती अभ्यासक उमाकांत राणिगा यांनी एकेकाळी  पावणे तीनशे तलावाचा कोल्हापूर जिल्हा आज हाताच्या बोटांच्या संख्येत येऊन पोहचला आहे.रंकाळासह कोटीतिर्थ व इतर तलावाच्या गत वैभवासाठी मनपावर अंकुश ठेवणारी जल साक्षरतेची लोक चळवळी ऊभी करावी ,आसे सांगत विविध संदर्भ ग्रंथा आघारे  संघ्यामठाची व रंकाळा तलावाची माहिती आपल्या ओघवत्या शैलीत  विषद करत   संध्यामठ मधील महादेव मूर्ती व गणेश मूर्ती या संबंधित ही माहिती त्यांनी  दिली. पक्षीमित्र बंडा पेडणेकर यांनी देश - विदेशातून रंकाळा तलावालर येणारे विविध पक्षी यांची तपशीलवार माहिती दिली.व पक्षीनिरीक्षणासाठी मोठा सचित्र माहिती फलक लावण्याचे आहवान केले. त्यानंतर शाहीर राजू राऊत यांनी विविध काव्यातून, शायरी व इतर काव्यातून रंकाळ्याची माहिती सांगितली आणि त्यांनी स्वरचित सादर केलेल्या रंकाळा दीर्घ काव्यासही ऊत्साही प्रतिसाद लाभला. या वेळी सपत्नीक ऊपस्थित निवृत माहिती संचालक  सतिश लळीत यांचेही डाँ.संदेश कचरे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले, तळीत यांनी कोल्हापूर सह पंचक्रोशीतील तलाव या विषयावर व्यापक गोलमेज परिषद घेण्याचे आहवान केले.
   या कल्पक अनोख्या सोहळ्याचे  नियोजन विश्वहिंदू परिषद, संस्कार भारती ने केले होते. या स्थानिक शिवसेना शाखा, संध्यामठ मित्र मंडळ, परीवर्तन फौंडेशन,राष्ट्रचेतना व स्वामी विवेकानंद चेरीटेबल ट्रस्ट सहभागी होते. या संघटना पदाघिकारी वर्गोने विविध वक्त्यांच्या आहवानास प्रतिसाद देत रविवारी ,२६ मे रोजी सकाळी सात ते दहा या वेळेत संघ्यामठ परिसरातच स्वच्छता मोहीमेत सहभागी होणार आसल्याचे जाहिर केले.या ऐतिहासिक माहितीचा लाभ घेण्यासाठी उपस्थित रंकाळाप्रेमींचा संकष्टी दिनी भाविकांचा उपवासाचा विचार करून अल्प आहाराचे नियोजन वाडीपिर चे ग्रामसेवक निलेश कुंभार, श्री स्वामी समर्थ मंदिराचे अध्यक्ष विजय सव्वाशे, सुरेश राठोड यांनी केले.या वेळी  पर्यटन अभ्यासक रवी सरदार , कवयत्री सई ललित  , बाजीराव ताटे, अक्षय साळवी,अमोल कुरणे आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवार यावेळी ऊपस्थित होते. यावेळी रंकाळा प्रेमी, अनेक संस्थापक व ट्रस्टी  उपस्थित होते. 

Comments