बारावीचा निकाल जाहीर---city news

सिटी न्यूज़


बारावीचा निकाल जाहीर : यंदाही मुलींची बाजी
कोल्हापूर :
         महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज   जाहीर झाला. दरवर्षीप्रमाणे यंदाही  मुलींनी  निकालात बाजी मारली. यंदा राज्याचा निकाल 85.88 टक्के लागला असून तो मागील वर्षापेक्षा 2.53 टक्क्यांनी घसरला आहे.  बारावीच्या लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये पार पडली. सीबीएसई, आयसीएसई आदी मंडळांचे निकाल मे च्या पहिल्या आठवड्यातच जाहीर झाले. त्यामुळे राज्य मंडळाच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते.

  •  विभागवार निकाल खालीलप्रमाणे

▪पुणे विभाग - 87.88 टक्के
▪नागपूर विभाग - 82.51 
▪औरंगाबाद विभाग - 87.29
▪मुंबई विभाग - 83.85
▪कोल्हापूर विभाग - 87.12
▪अमरावती विभाग - 87.55
▪नाशिक विभाग - 84.77
▪लातूर विभाग - 86.06
▪कोकण विभाग - 93.23

Comments