kolhapur city news

 सिटी न्यूज़ 
कोल्हापूर शहर 
कोल्हापूर   २२ : आमदार राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून यशवंत यादव यांच्यावर मुंबईमध्ये ह्रदय विकाराची यशस्वी शस्त्रक्रिया 
कोल्हापूर दि. २२ : कसबा बावडा येथील रणदिवे गल्ली येथे राहणारे यशवंत भाऊसाहेब यादव हे हृदय विकाराने ग्रस्त होते. कोल्हापुरातील रुग्णालयात तपासणी केली असता ह्र्दयाची झडप प्रत्यारोपण करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांना सांगण्यात आले. यासाठी सुमारे ४ लाख रुपये खर्च येईल, असे सांगण्यात आले होते. एवढे महागडी शस्त्रक्रियेबाबत द्विधा मनस्थितीत असलेल्या यादव कुटुंबीयांना आमदार राजेश क्षीरसागर यांनी आधार दिला. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून यशवंत यादव यांच्यावर मुंबईमध्ये हृदय विकाराची यशस्वी मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. यशस्वी उपचारानंतर ठणठणीत बरे झालेल्या यशवंत यादव यांनी सहकुटुंब आमदार राजेश क्षीरसागर व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्ष सौ.वैशाली राजेश क्षीरसागर यांची सदिच्छा भेट घेवून आभार मानले.
कसबा बावडा येथील रणदिवे गल्ली येथे राहणारे सर्वसामान्य कुटुंबातील यशवंत यादव यांचा संपूर्ण उदरनिर्वाह शेतीवर चालतो. फेब्रुवारी २०१९ च्या दरम्यान त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना उपचारासाठी अॅपल हॉस्पिटल या दवाखान्यात नेण्यात आले. या ठिकाणी विविध स्कॅनिंग केल्यानंतर त्यांच्या हृदयाची झडपेमध्ये बिघाड झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सदर झडपेचे प्रत्यारोपण करण्याची शस्त्रक्रिया तातडीने करावी लागेल व त्यासाठी सुमारे चार लाख रुपये इतका खर्च असल्याचे सांगण्यात आले. शेतकरी असलेल्या यादव कुटुंबीयांवर इतका पैसा आणायचा कुठून हा यक्षप्रश्न उभा राहिला. दरम्यान, यादव कुटुंबियांना आमदार राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून होणाऱ्या वैद्यकीय कामांची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने आमदार राजेश क्षीरसागर यांची भेट घेतली. यानंतर आमदार  राजेश क्षीरसागर यांनीही सामाजिक बांधिलकीतून तातडीने आपल्या प्रतिनिधीस आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याची सूचना दिली. यासह मुंबई हॉस्पिटल मधील तज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधून यशवंत यादव यांच्याबाबत माहिती दिली. यानंतर तीन दिवसातच यशवंत भाऊसाहेब यादव यांना मुंबई हॉस्पिटल मुंबई येथे दाखल करण्यात आले. त्यांच्यावर दि.०६ मार्च २०१९ रोजी गुंतागुंतीची हृदयाची झडप प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया  मोफत करण्यात आली. सुमारे दोन महिन्यांच्या बेड रेस्ट नंतर ठणठणीत बरे झालेल्या यशवंत यादव यांनी  त्यांच्या कुटुंबीयांसमवेत आमदार राजेश क्षीरसागर यांची भेट घेवून आभार मानले. आमदार राजेश क्षीरसागर यांनी केलेले प्रयत्न माझ्यासाठी एक वरदान असल्याची गोष्ट यशवंत यादव यांनी बोलत आमदार राजेश क्षीरसागर यांना पेढा भरवून त्यांचे आभार मानले. 
यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, आपले हे वैद्यकीय काम ही जनतेची सेवाच असून, आजपर्यंत हजारो गोरगरीब रुग्णांवर उपचार, शस्त्रक्रिया केले असल्याचे सांगितले. यासह आमच्या फौंडेशनच्या माध्यमातून उपचार करून घेणाऱ्या तसेच आर्थिक मदतीचा लाभ घेणाऱ्या रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. कोणतीही मतभेद न ठेवता माणुसकीच्या नात्याने कोल्हापूर शहरासह कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णांनाही मदत केली जाते. त्यामुळे सर्वसामान्यांना एक आधारवड प्राप्त झाला असून, येणाऱ्या काळामध्ये आपली रुग्णसेवा अशीच अविरत सुरु रहाणार असून, मेंदू, हृदय विकार, किडनी, कॅन्सर, पोट विकार, मणक्याचे विकार, हात- पायावरील शस्त्रक्रिया आदी महागड्या विकारांवरील शस्त्रक्रिया किवा उपचार घेनाऱ्या रुग्णानी शिवसेना शहर कार्यालय, शनिवार पेठ या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले आहे. 

यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्ष सौ.वैशाली राजेश क्षीरसागर यांच्यासह यशवंत यादव यांच्या पत्नी सौ. वंदना यादव, शशिकांत माने, राजवर्धन माने, सौ. शोभा माने, रणजीत सासने आदी उपस्थित होते. 

Comments