सिटी न्यूज़
टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध भगव्या जर्सीत दिसणार, बीसीसीआयची घोषणा
विश्वचषक २०१९
टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध रविवारी निळ्या जर्सीत नाही तर भगव्या जर्सीत दिसणार आहे. क्रिकेट नियामक मंडळाने अखेर अधिकृत घोषणा केली. भारतासाठी निळी जर्सी लकी असल्याचेही काही जण म्हणतात. पण आता इंग्लंडविरुद्ध सामन्यात भारताला निळ्या जर्सीने खेळता येणार नाही. भारत आणि इंग्लंड यांचा सामना 30 जूनला होणार आहे. या सामन्यात भारतीय संघ 'ऑरेंज जर्सी' परीधान करणार आहे. आतापर्यंत या 'ऑरेंज जर्सी'बाबत बरीच चर्चा झाली. पण या 'ऑरेंज जर्सी'चा लूक नेमका कसा असेल, हे कोणालाही माहिती नव्हते. पण आज या 'ऑरेंज जर्सी'चे अनावरण करण्यात आले आणि तिचा पहिला लूक पाहायला मिळाला.
Comments
Post a Comment