आमदार राजेश क्षीरसागर यांच्या निवडीनंतर कोल्हापुरात जल्लोष

सिटी न्यूज़ 
आमदार राजेश क्षीरसागर यांच्या निवडीनंतर कोल्हापुरात जल्लोष



 
कोल्हापुरातील शिवसैनिकांनी केला साखर पेढे वाटून आनंदोत्सव

कोल्हापूर दि.१७  : कोल्हापूर शहराचे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांची राज्य नियोजन आयोगाच्या कार्यकारी अध्यक्ष पदावर निवडीनंतर कोल्हापुरातील शिवसैनिकांनी आज जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी, हलगीच्या गजरात साखर पेढे वाटून शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी चौकात आनंदोत्सव साजरा केला. मा.मुख्यमंत्री यांच्याकडे असणारे महत्वाचे पद सच्च्या कार्यकर्त्याला मिळाल्याची भावना यावेळी शिवसैनिकांनी व्यक्त केली.  
आमदार राजेश क्षीरसागर यांना राज्यमंत्री पद मिळावे यासाठी  शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धवजी ठाकरे आग्रही होते. परंतु मंत्रीमंडळातील संख्याबळ वाढविता येणार नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार आमदार राजेश क्षीरसागर यांना योग्य संधी देण्याच्या दृष्टीने राज्य नियोजन आयोगाच्या “कार्यकारी अध्यक्ष” पदाची धुरा देण्यात आली आहे. 
आमदार राजेश क्षीरसागर हे शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या निवडीनंतर कोल्हापुरातील शिवसैनिक आज छत्रपती शिवाजी चौक येथे एकत्र आले. प्रथम शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याठिकाणी “जय भवानी, जय शिवाजी”, “शिवसेना जिंदाबाद” “शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख मा.उद्धवजी ठाकरे आणि आमदार राजेश क्षीरसागर” यांच्या विजयाच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यानंतर नागरिकांना साखर पेढे वाटप करण्यात आले. यासह फटाक्यांची आतषबाजी आणि हलगीच्या ठेक्यावर ताल धरत जल्लोष साजरा केला. 
यावेळी शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, परिवहन सभापती अभिजित चव्हाण, शिवसेना गटनेते नियाज खान, नगरसेवक राहुल चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते महेश उत्तुरे, महिला आघाडी शहरप्रमुख मंगलताई साळोखे, सौ. पूजा भोर, सौ. गौरी माळदकर, सौ. पूजा कामते, सौ. अनुराधा परमणे, सौ. मीनाताई पोतदार, दीपक गौड, पद्माकर कापसे, तुकाराम साळोखे, रमेश खाडे, सुनील जाधव, रघुनाथ टिपुगडे, किशोर घाटगे, अमित चव्हाण, सुनील भोसले, राजू काझी, उदय भोसले, सुरेश कदम, युवासेनेचे अविनाश कामते, योगेश चौगुले, चेतन शिंदे, राज जाधव, सौरभ कुलकर्णी, अंकुश निपाणीकर,  मंदार तपकिरे, कपिल सरनाईक, विनय वाणी, प्रशांत जगदाळे, राज अर्जुनिकर, प्रशांत जगदाळे, साहिल मुल्लांनी, कपिल केसरकर, अल्लाउद्दीन नाकाडे, राज कापसे, रणजीत सासणे, आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.      

Comments