सिटी न्यूज़
पोहत जाऊन रंकाळा संध्यामठ गणेशाला अभिषेक
कोल्हापूर - शहराचा मानबिंदू असलेल्या रंकाळा तलावातील ,फक्त दीड दोन महिनेच दर्शनास ऊपलब्घ असलेल्या संघ्यामठ गणेशाची सुबक मुर्ती , गणेशभक्तासह सगळ्यानाच नेहमीच भुरळ घालते.या गणेशासह शिवलिंगास आज ,२० जून गुरूवार संकष्टी दिनी या संध्या मठ गणेशाला पोहत जाऊन गणेश भक्तानी सामुहीक सकाळी सव्वासात वाजता आरतीसह अभिषेक केला .या मघ्ये दुर्गळे महाराज भास्कर पाटील निवास घनवडे, शामराव साळोखे, राजन मकोटे , मनोहर साळोखे आदिचा समावेश होता. यांचेसह अनेक भक्तानी रंकाळा काठावरुन या आरतीमघ्ये सहभाग घेतला.अभिषेक - आरती नतंर ऊपस्थिताना पेढे -पंचामृत प्रसाद वाटप करण्यात आले.रंकाळा तलाव परिसरातील पतोडी घाट सह आर.के .पुतळा समोरील बागेतील प्रेस गणेश,टाँवर जवळील गणेश आणि जाऊळाचा गणपती येथे ही गणेश भक्तनी आज गुरुवारच्या संकष्टी दिनी सकाळ पासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती, यात ही पोहत जाऊन संघ्यामठ गणेश अभिषेक पुजा ही आकर्षक राहीली...
Comments
Post a Comment