सिटी न्यूज़
विश्वचषक २०१९
अफगाणिस्तानवर विजय मिळवत भारताने केला हा विक्रम
World Cup 2019 IND vs AFG : अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताने ११ धावांनी विजय मिळवला. अत्यंत चुरशीच्या लढतीत भारताने दडपणाखाली चांगली कामगिरी करत विजयाचा चौकार लगावला. भारताने प्रथम फलंदाजी करत २२४ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना मोहम्मद शमीच्या हॅटट्रिकच्या जोरावर भारताने हा विजय संपादन केला. मोहम्मद नबीने अर्धशतक करत चांगली झुंज दिली. पण त्याची झुंज अयशस्वी ठरली.
भारताचा हा विश्वचषक स्पर्धेतील ५० वा विजय ठरला. अशी कामगिरी करणारा भारत जगातील केवळ तिसरा देश ठरला. या यादीत ऑस्ट्रेलिया अव्वल आहे. ऑस्ट्रेलियाने एकूण ६७ विश्वचषक सामने जिंकले आहेत. न्यूझीलंड या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडने आतापर्यंत ५२ विश्वचषक सामन्यात विजय प्राप्त केला आहे. यानंतर आज भारताने ५०वा विजय संपादन केला आणि विक्रमी विजयाची नोंद केली.
दरम्यान, २२५ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा डावखुरा फलंदाज हजरतुल्लाह त्रिफळाचीत झाला. जायबंदी भुवनेश्वर कुमारच्या जागी संघात स्थान मिळालेल्या मोहम्मद शमीने त्याला बाद केले. हजरतुल्लाहने २४ चेंडूत १० धावा केल्या. पाठोपाठ हार्दिक पांड्याने टाकलेल्या बाउन्सर चेंडूवर गुलबदिन झेलबाद झाला. त्याने ४२ चेंडूत २ चौकारांसह २७ धावा केल्या. ४२ धावांची आश्वासक भागीदारी करणारे अफगाणिस्तानचे दोनही फलंदाज बुमराहच्या निर्धाव षटकात बाद झाले. चौथ्या चेंडूवर रहमत शाह ३६ धावांवर बाद झाला. तर शेवटच्या चेंडूवर हाशमतुल्लाह शाहिदी बुमराहकडेच झेल देऊन २१ धावांवर माघारी गेला. छोटया भागीदारीनंतर असगर अफगाण माघारी परतला. युजवेंद्र चहलने त्याचा अडसर दूर केला.
भारतासारख्या दिग्गज संघाला अफगाणिस्तानसारख्या अनुनभवी संघांचे चांगलेच झुंजवले. अखेरच्या षटकापर्यंत हा सामना चांगलाच रंगला.
साऊदॅम्प्टन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : अत्यंत रंगतदार झालेल्या लढतीत वेस्ट इंडिजवर अवघ्या 5 धावांनी मात करत न्यूझीलंडने यंदाच्या विश्वचषकातील पाचव्या विजयाची नोंद केली. न्यूझीलंडने दिलेल्या 292 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ख्रिस गेल आणि सिमरॉन हेटमायरच्या झंझावाती फलंदाजीनंतर मधली फळी कोलमडली. मात्र तुफानी शतकी खेळी करताना कार्लोस ब्रेथवेटने लढतीत रंगत आणली होती. शतक पूर्ण केल्यानंतर ब्रेथवेटने मारलेला एक उत्तुंग फटका ट्रेंट बोल्टने सीमारेषेनजीक टिपला आणि न्यूझीलंडला पाच धावांनी रोमहर्षक विजय मिळवून दिला.

- रोमांचक लढतीत विंडीजला नमवून न्यूझीलंडची अव्वलस्थानी झेप
साऊदॅम्प्टन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : अत्यंत रंगतदार झालेल्या लढतीत वेस्ट इंडिजवर अवघ्या 5 धावांनी मात करत न्यूझीलंडने यंदाच्या विश्वचषकातील पाचव्या विजयाची नोंद केली. न्यूझीलंडने दिलेल्या 292 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ख्रिस गेल आणि सिमरॉन हेटमायरच्या झंझावाती फलंदाजीनंतर मधली फळी कोलमडली. मात्र तुफानी शतकी खेळी करताना कार्लोस ब्रेथवेटने लढतीत रंगत आणली होती. शतक पूर्ण केल्यानंतर ब्रेथवेटने मारलेला एक उत्तुंग फटका ट्रेंट बोल्टने सीमारेषेनजीक टिपला आणि न्यूझीलंडला पाच धावांनी रोमहर्षक विजय मिळवून दिला.
Comments
Post a Comment