सिटी न्यूज़
मोहम्मद शमीने रचला इतिहास, वर्ल्डकपमध्ये हॅटट्रिक करणारा ठरला दुसरा भारतीय
-------------------------------------
-------------------------------------
साऊदॅम्प्टन, आयसीसी वर्ल्ड कप 2019, भारत वि. अफगाणिस्तान : विश्वचषकामध्ये आज अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत भारताने अफगाणिस्तानवर 11 धावांनी मात केली. या लढतीत मोहम्मद शमीने भेदक मारा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. यादरम्यान, डावातील शेवटच्या षटकात अफगाणिस्तानला विजयासाठी 16 धावांची गरज असताना शमीने शेवटच्या तीन फलंदाजांना तंबूची वाट दाखवत हॅट्ट्रिक नोंदवली. त्याने आपल्या शेवटच्या षटकाच्या तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर अनुक्रमे मोहम्मद नबी, अफताब आलम आणि मुजीब उर रहमान यांना त्रिफळाबाद केले.
क्रिकेट विश्वचषकामध्ये हॅटट्रिक नोंदवणारा शमी हा एकूण दहावा आणि भारताचा दुसरा गोलंदाज ठरला. याआधी चेतन शर्मा यांनी 1987 च्या विश्वचषकात हॅटट्रिक नोंदवली होती. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताकडून याआधी चेतन शर्मा, कपिल देव आणि कुलदीप यादव यांची हॅटट्रिक नोंदवली आहे.
‼ विश्वचषषकात आतापर्यंत नोंदवल्या गेलेल्या हॅटट्रिक
१९८७- चेतन शर्मा
१९९९- साकलेन मुश्ताक
२००३- चमिंडा वास
२००३- ब्रेट ली
२००७- लसिथ मलिंगा (चार चेंडूत चार बळी)
२०११- केमार रोच
२०११- लसिथ मलिंगा
२०१५- स्टीव्हन फिन
२०१५- जे.पी.डुमिनी
२०१९- मोहम्मद शमी
Comments
Post a Comment