सिटी न्यूज़
आमदार राजेश क्षीरसागर यांचे शहरात जल्लोषी स्वागत
कोल्हापूर दि.२० : कोल्हापूर शहराचे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांची राज्य नियोजन आयोगाच्या कार्यकारी अध्यक्ष पदावर निवडीनंतर कोल्हापुरातील शिवसैनिकांमध्ये जल्लोषी वातावरण निर्माण झाले आहे. आमदार राजेश क्षीरसागर महाराष्ट्र राज्याच्या पावसाळी अधिवेशनाकरिता मुंबई येथे होते. त्यांचे आज कोल्हापूर शहरात आगमन झाले. आपल्या लाडक्या नेतृत्वावर शुभेछ्याचा वर्षाव आणि जल्लोषी स्वागत शिवसेना शहर कार्यकारणी आणि तमाम शिवसैनिकांच्या वतीने करण्यात आले.
आमदार राजेश क्षीरसागर यांच्या निवडीनंतर शहरात शिवसैनिक व हितचिंतकांच्या वतीने अभिनंदन फलक लावण्यात आले आहेत. शिवसेना शहर कार्यकारणीच्या वतीने आमदार राजेश क्षीरसागर यांच्या स्वागतासाठी “छत्रपती ताराराणी पुतळा, कावळा नाका” येथून भव्य भगव्या दुचाकी रॅलीचे आयोजन केले.
राज्य नियोजन आयोगाच्या कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांचे दुपारी १२ च्या दरम्यान कावळा नाका येथे आगमन झाले. शिवसेना महिला आघाडीच्या वतीने याठिकाणी औक्षण ओवाळून त्यांचे स्वागत केले. यानंतर आमदार राजेश क्षीरसागर यांनी महाराणी ताराराणी यांच्या प्रतिमेस वंदन करून पुष्पहार अपर्ण केला. यावेळी महापौर सौ. सरिता मोरे, शिवसेना शहरप्रमुख श्री. रविकिरण इंगवले, शिवसेना गटनेते नियाज खान, नगरसेवक राहुल चव्हाण, नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, माजी उपमहापौर दिगंबर फराकटे आदींनी आमदार राजेश क्षीरसागर यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
यावेळी शिवसैनिकांनी “जय भवानी जय शिवाजी” “शिवसेना जिंदाबाद” “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, युवा सेना अध्यक्ष आदित्यजी ठाकरे” याच्यासह आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विजयाच्या घोषणांनी कावळा नाका परिसर दणाणून सोडला.
यानंतर कावळा नाका रॅलीस सुरवात करण्यात आली. ही रॅली दाभोलकर कॉर्नर, रेल्वे स्टेशन, व्हीनस कॉर्नर, दसरा चौक, सीपीआर चौक, छत्रपती शिवाजी चौक, पापाची तिकटी मार्गे शिवसेना शहर कार्यालय अशी काढण्यात आली. दरम्यान आमदार राजेश क्षीरसागर यांनी रॅली मार्गावरील छत्रपती राजाराम महाराज, राजर्षी शाहू महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना वंदन केले. शिवसेना शहर कार्यालय येथे ताराराणी गारमेंट पार्क व भगिनी मंचच्या वतीने महिलांनी आमदार राजेश क्षीरसागर यांचे औक्षण ओवाळून स्वागत केले. यासह रॅली मार्गावर शिवसेनेचे विभाग व शाखांच्या वतीने आमदार राजेश क्षीरसागर यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे अमर समर्थ, महेश उत्तुरे, जयवंत हारुगले, रमेश खाडे, तुकाराम साळोखे, रणजीत जाधव, सुनील खोत, अजित राडे, किशोर घाटगे, सुनील जाधव, राहुल चव्हाण, प्रकाश सरनाईक, अमित चव्हाण, शिवसेना महिला आघाडीच्या सौ.मंगलताई साळोखे, सौ. पूजा भोर, सौ. गोरी माळदकर, सौ. पूजा कामते, सौ. शाहीन काझी, सौ. पूजा पाटील, सौ. मीनाताई पोतदार, सौ. अनुराधा परमणे आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, रॅली नंतर राज्य नियोजन आयोगाच्या कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी सह कुटुंब आई अंबाबाई आणि आई तुळजाभवानी चे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या पत्नी देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा सौ.वैशाली क्षीरसागर, चिरंजीव ऋतुराज क्षीरसागर, चिरंजीव पुष्कराज क्षीरसागर, स्नुषा सौ. दिशा क्षीरसागर उपस्थित होते.

Comments
Post a Comment