सिटी न्यूज़
कोल्हापूर(राजेंद्र मकोटे ) २८ : लोकसभा निवडणूकीच्या संदर्भातील नाट्यमय घडामोडी नंतर महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी अखेर सत्ताधारी राष्ट्रवादीतून माधवी गवंडी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. विरोधी भाजप-ताराराणी आघाडीने महापौर पदासाठी अर्ज दाखल न केल्याने गवंडी यांची निवड बिनविरोध झाली. त्यांच्या या निवडीवरून मंगळवारी दोन जुलै रोजी होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेत अनौपचारिकरीत्या शिक्कामोर्तब होईल
राष्ट्रवादीच्या नगरसेविका अॅड. सूरमंजिरी लाटकर, माधवी गवंडी व अनुराधा खेडकर यांनी महापौरपदाच्या उमेदवारीची मागणी केली होती. त्यामुळे राष्ट्रवादीतून कुणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. राष्ट्रवादीचे आ. हसन मुश्रीफ यांनी काल, गुरुवारी सायंकाळी सर्किट हाऊसमध्ये नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत आमदार मुश्रीफ आणि माजी महापौर सरिता मोरे यांच्यात जोरदार वादावादी झाली होती.
माजी खासदार धनंजय महाडिक यांनी माजी शहराध्यक्ष राजू लाटकर यांच्या पत्नी अॅड. लाटकर यांना उमेदवारी देऊ नये, असे पत्र पक्षाच्या वरिष्ठांना पाठविले होते. यामुळे या निवडीला चांगलाच रंग आला होता. मात्र अखेर या नाट्यमय घडामोडीनंतर गवंडी यांनी आज, आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. विरोधी भाजप-ताराराणी आघाडीने महापौर पदासाठी अर्ज दाखल न केल्याने गवंडी यांची निवड बिनविरोध झाली. त्यांच्या या निवडीवर दोन जुलै रोजी होणाऱ्या महापालिकेतील विशेष सर्वसाधारण सभेत अनौपचारिक शिक्कामोर्तब होईल .लवकरच होणाऱ्या विधानसभा निवडणूकाच्या संदर्भाने पाहता , ही बिनविरोघ निवड महत्वाची मानली जात आहे , या निवडी मुळे राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यकर्ते वर्गोला नवा ऊत्साह मिळणार आहे...
कोल्हापूरच्या नुतन महापौरपदी माधवी गवंडी बिनविरोध निवड

Comments
Post a Comment