आषाढी एकादशी

सिटी न्यूज़

                       आषाढी एकादशी

 अभूतपूर्व उत्साहात कोल्हापूर - नंदवाळ  दिंडीत उभे आणि गोल रिंगण संपन्न कोल्हापूर -- प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या नंदवाळ गावी आज आषाढी वारी निमित्त कोल्हापूरहून निघालेल्या दिंडीत पंचक्रोशीतील 70 हून  गावातील वारकरी बंधू-भगिनी सहभागी झाले होते श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा भक्त मंडळा तर्फे याचे  आयोजन करण्यात आले होते . मंगळवार  पेठेतील विठ्ठल  मंदिरातून सकाळी सात वाजता षसामुहीक आरती नतंर  बिनखांबी मार्गाने दिंडी रवाना झाली.दरम्यान  खोलखंडोबा इथे उभे रिंगण पार पडले या ठिकाणी अश्व पूजन विक्रम जरग ,  तसेच चव्हण बंधू ,जयकुमार  देसाई  यांनी केली यानंतर राधानगरी रोड ,साने गुरुजी वसाहत मार्ग ही दिंडी पुईखडी  येथे विसाव्यासाठी संपली .येथे अर्जुन ग्रुप आणि नगरसेवक शारंगधर देशमुख मित्र परिवार तर्फे भविष्यासाठी फराळाची व्यवस्था करण्यात आली होती या ठिकाणी आमदार राजेश क्षीरसागर आमदार सतेज पाटील मान्यवरांनी पालखीचे पूजन केले यानंतर पंढरपूर -  वाखरी प्रमाणे विठू माऊली च्या गजरात गोल रिंगण पार पडले या नतंर दिंडी प्रति प्रति पंढरपूर नंदवाळ कडे रवाना झाली. दरम्यान सानेगुरुजी वसाहत अर्बन बँक शाखा कोल्हापूर रोड वाशी नाका मित्र मंडळ शिवसेना वाहतूक शाखा सायबा ग्रुप सरनाईक कॉलिंग संस्थानी राजगिरा लाडू खिचडी चहा आधी फराळाचे वारकरी बंधूंचा टिंग आयोजन केले होते दरम्यान दीपक गोड बाळासो पवार दिंडीप्रमुख हभप लाड महाराज ,राजेंद्र मकोटे, एम पी पाटील सर यांच्यासह मान्यवरांचा सहभाग राहिला. या दिंडीत कागल ,  नंदवाळ सह इचरकंजी शिरोली सांगाव सह पंच क्रोशीतील  वारकरी बंधू-भगिनी सहभागी झाले होते

Comments