मनोरंजन ----अक्षयकुमारच्या मिशन मंगल चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

सिटी न्यूज़
मनोरंजन 




                    अक्षयकुमारच्या मिशन मंगल चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

 भारताच्या मंगळ मोहिमेची खरी कथा मांडणारा 'मिशन मंगल' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
 नेहमीपेक्षा काहीतरी वेगळा विषय घेऊन येणाऱ्या या चित्रपटाची प्रेक्षकही आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतंच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला.
 या चित्रपटात अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, किर्ती कुल्हारी, निथ्या मेनन आणि शर्मन जोशी यांची झलक पाहायला मिळणार आहे.
 बाल्की आणि जगन शक्ती दिग्दर्शित हा चित्रपट स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.
 या चित्रपटातून स्त्री शक्तीची कथा जगासमोर मांडली जाणार आहे.


मिशन मंगलचा ट्रेलर पहा :
https://youtu.be/SPZJFnym8Q0

Comments