यशस्वी आयर्न मॅन चा ताराराणी चौकात जल्लौषी स्वागतासह सत्कार

सिटी न्यूज़

यशस्वी आयर्न मॅन चा ताराराणी चौकात जल्लौषी स्वागतासह सत्कार



कोल्हापूर -- ऐतिहासिक ताराराणी पुतळ्याच्या साक्षीने आज सकाळी  ऑस्ट्रिया येथे संपन्न झालेल्या आयर्न मॅन स्पर्धेत यशस्वी झालेली कोल्हापूरकर  11 स्पर्धकांचा हदयस्पर्शी सत्कार करण्यात आला. यशस्वीरीत्या ही स्पर्धा पार करून कोल्हापूरचे हे  सर्व स्पर्धक आज सकाळी  कोल्हापूर येथे दाखल झाले , त्यांचे भुरभुरत्या पावसात  विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचे स्वागत करण्यात आले .     या स्पर्धेचे स्वरूप म्हणजे 3.8 किलोमीटर स्विमिंग 182 किलोमीटर सायकलिंग व 42.2 किलोमीटर रनिंग हे संपूर्ण 17 तासाच्या आत पूर्ण केल्यावर  आयर्नमॅन हा किताब पदवी मिळते. या स्पर्धेत वरूण कदम, अमर धामणे, अविनाश सोनी, कुमार ब्रिजवानी, उदय पाटील, बेळगावकर व बाबासाहेब पुजारी वगैरे 11 लोकांनी ही स्पर्धा पूर्ण केली . ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी स्पर्धकांनी दोन वर्ष कठोर सराव केला व ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी स्पर्धकांना निळकंठ आरवाडे,( स्विमिंग) धीरज व पंकज रावळू व अश्विन भोसले यांनी मार्गदर्शन व तयारी करून घेतली. त्यांना गत  वर्षाचे आयर्न मॅन चेतन चव्हाण यांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी आयर्न मॅन सत्कार समितीचे अध्यक्ष जयेश भाई कदम, मिलिंद कणसे, संजय कदम एस आर पाटील, ऍडव्होकेट राजेंद्र किंकर, सचिन तोडकर ,दिलीप देसाई, राजू लींग्रज, बाळासाहेब मुधोळकर ,गणी आजरेकर, नगरसेवक रत्नेश शिरोळकर या सर्व मान्यवरांनी त्यांचे स्वागत व सत्कार महाराणी ताराराणी  पुतळ्याच्या साक्षीने केला . या वेळी क्रीडा - सामाजिक  क्षेत्रातील मान्यवर खेळाडू ऊपस्थित होते.

Comments