सिटी न्यूज़
मा चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष
मा चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष
मा चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. आगामी विधानसभा निवडणुका अवघ्या अडीच महिन्यांवर आल्या असल्याने चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या जातील हे स्पष्ट झाले. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काही वेळामध्येच चंद्रकांत पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत दानवे यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्वितीय केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपदावर वर्णी लागली.
Comments
Post a Comment