सिटी न्यूज़
जॉब मार्केटिंगचा
जॉब मार्केटिंगचा
(सदरची पोस्ट व्हाट्सप्प च्या मार्फ़त आली आहे लेखकाचे नाव महित नाही पण त्या लेखकास धन्यवाद )
मार्केटिंग/सेल्सवाल्यांचं वाल्याचा जॉब, ज्यांनी त्याचे लाईफ जवळून पाहिले असेल त्यांना कळेल की काय असते ते, आणि जे त्याचा कामाचा हिस्सा असतात ते काय शारीरिक आणि मानसिक हिंदोळे घेत असतात ते तेच जाणे....
आणि जे ते आयुष्य जगत असतात ते तर किती रोल ऐका वेळी जगत असतात ते खरंतर अग्निदिव्यच असते हे मात्र खूप जणांना हे समजत ही नाही..... कारणही म्हणा तशीच असतात....
कायम टीप टॉप कपडे, चचकीत बूट सतत चेहऱ्यावर कृत्रिम असूनही नायचरल वाटणारं हास्य, बोलण्यातील सुशीलता, उपलब्ध असलेली सर्व प्रवासाची साधने पेट्रोलची भाववाढ विचारत न घेता वापरणे कधी हवाई यात्रा आणि सतत बाहेर हवे ते आणि तिथे खाणे आणि तारांकित हॉटेल मधील मीटिंग कोणासही हेवा वाटावा अशी दिखाऊ जीवन शैली..... मग कोणीही हेवाच करणार ह्यात चूक कोणाचीही नाही....
हे सर्व तो स्वतः साठी करतोय का हा विचार बाहेरील कोणी करतच नाही आणि दिसते त्या वर जग फसते म्हटल्यावर तुम्ही काही करूच शकत नाही पण कधी चुकून पडताळणी केली तर तो सेल्सवाला हे सगळं त्याच्या ड्युटीचा भाग म्हणून कर्तव्य पार पाडत असतो हे बऱ्याच वेळी समजून ही पटत नाही.....
नाण्याच्या दोन बाजू कशा गमतीशीर असतात पहा लोक म्हणतात तुमची मजा आहे रोज नवीन गाव, नवीन हॉटेल रोज बाहेरच खाण मजा आहे बुवा आणि तो म्हणतो तुम्ही भाग्यवान रोज तुम्ही घरच आई-बायकोच्या हातच खाता, आता यात दोष कोणाचा..... तुमची बायका पोर रोज ऐकटे घरात जेवतात आणि तुम्ही बाहेर खाता, खरंच सुखाने घास खाली उतरत असेल का, कोणी विचार तरी करत का, कधी सलग तीन चार वेळा बाहेतच खा नाही कंटाळलात तर सांगा....
तीच गोस्ट टापटीप कपडे बुटांची अरे नाही हो त्याला उन्हाळ्यात ही फुल हाताचा शर्ट तो ही इन करून घालावा लागतो वर गळफास म्हणून टाय, लेसवाले चामड्याचे बुटच घालावे लागतात मग कोणताही मोसम असो अगदी धोधो पाऊस पडत असतो तेव्हा ही तेच बूट, सांगा काय मजा येत असेल त्या जीवाला काय त्याला नाही वाटत स्पोर्ट शूज त्या वर, जीन्स टी शर्ट घालावा किंवा कोल्हापुरी चपला व झब्बा घालावा पण हे सगळं वर्ज्य कारण कामाचे स्वरूप असे की तुम्ही कायम प्रेझेंटेबलच असे राहायला हवे, किती चांगले असले तरी कॅज्युअल कपडे नाही घालायचे आणि शो कायम ऑन ठेवायचा ते ही अपडेटेड नॉलेज सह मग ते कोणत्याही क्षेत्रातील असो राजकारण ते अर्थकारण, स्पोर्ट्स ते सिनेमा आणि हो तुमच्या विषयातर.....
पैसा पोझिशन सांभाळताना डोंबर्याच्या बायको पेक्षा ही जास्त कसरत करतो हा, डोंबर्याची बायको बरी ती तरी फक्त ढोलकीच्या ताला वर नाचते हा भाऊ किती जणांच्या किती तर्हेच्या तालावर आणि कुठे कुठे नाचतो हे त्याचे त्यालाच ठाऊक....
ज्या कंपनीची नोकरी करता त्या कंपनीस व साहेबास पटेल तेच करा आणि कस्टमर म्हणजे माय-बाप-ईश्वर मग तो म्हणेल तस नाचायचे......
हे सर्व करताना त्याचे घरात किती लक्ष असते आणि कसे असते ते तो आणि त्याचे घरवालेच जाणो..... घरच्यांनी जर सपोर्ट नाही केला तर मग हा मेलाच कारण त्यांचे आयुष्य ह्याच्या पेक्षा रद्दी असते हे तोच जाणून असतो, परत कधी उधडपणे त्यांनी बायका मुलांची त्याच्या सहभागाची चारचौघात तारीफ केली तर तमाम हजर लोक, विशेषतः स्त्री वर्ग असा काही लूक देतो की त्याचा पत्नीची काय स्थिती होते ते दोघेच जाणे, ह्याचा घराचा कुटुंब प्रमुख हा नावालाच असतो खरी लढाई घरातील स्त्रीच लढते, तिची तारीफ करणे इतका मोठा गुन्हा आपल्या समाजात का ठरतो हे अनाकलनीय कोड आहे.....
न याने मुलाचे रांगणे पाहिले, न त्याला दिसले पहिले टाकलेले पाऊल, ट्रिपल पोलिओ द्यायला ही मनात असून ही हा गैरहजर, हा कधी मुलांच्या पीटीएमला गेलेला, न मुलांच्या यशाअपयशाचा साक्षीदार बनलेला, न शाळा कॉलेज मधील समारंभास उपस्थित न रहाणारा आणि सहधर्म चारणीच्या नशिबी तर हा सर्वात शेवटी येणारा प्राणि, गळफास लागलकीच तो तिची सुख दुःख हाताळणार आणि वेळ निभावली की परत पहिले पाढे पंचावन्न.....
ह्याने मंथ एंडच्या नावा खाली दर महिन्याचा शेवटचा आठवडा परागांदा झालेला मग घरात काहीही होवो हा बाहेरच.....
परिस्थिती सर्वाना तिच्या नुसार घडवते मग घरातील चिमणी लेकर ही डोळ्यातील पाणी लपवून ह्याच्या पाठी उभी राहतात, इतर घरातील मुलांच्या सारखे नाही हट्ट करत बाबा मी ऐकटी जाईन, आई आहेना, तू नको इथली चिंता करू, आपण सेलिब्रेशन नंतर करू नको टेन्शन घेऊ ये टूर वरून तू, खरंच काय होत असेल हे त्या पोटच्या गोळ्याला बोलताना आणि त्याची काय स्थिती होत असेल हे शब्द कानावर पडताना.....
त्याच्या काय सर्वांच्याच मुली लवकर समजदार होतात पण ह्याची पोर इतर मुलींच्या पेक्षा ही लवकर समजदार होते ह्याचा अनुभव गेली तेवीस वर्ष अनुभवतो आहे, वर्षातील ऐक वाढदिवस तो ही मंथ एंडला, मूळे तो नाही मुलीला नाही वेळ देऊ शकत, असा हा इतरांच्या सारखाच हाडांमसाचाच जीव जबाबदाऱ्या आणि कर्तव्यपूर्ती पाई कसल्या धातूचा बनतो हे अनाकलनीय आहे......
Comments
Post a Comment