सिटी न्यूज़
विश्व संवाद केंद्र आणि लोक ऊत्कर्ष समिती आयोजित नारद जंयती
विश्व संवाद केंद्र आणि लोक ऊत्कर्ष समिती आयोजित नारद जंयती
दरिद्रीनारायणाच्या सेवेतून विज्ञान निष्ठ जीवन तत्वज्ञान मांडून अवघ्या जगाला स्वामी विवेकानंदानी नवी दृष्टी दिली :सुहास लिमये
कोल्हापूर : समाजात भुकल्या पोटी प्रवचन पचनी पडत नाही तर या दरिद्रीनारायणाच्या सेवेतच धर्म - जीवनाचे मुलभूत तत्वज्ञान समावले आहे , अशी अवघ्या जगाला भारावून टाकणारी नवी कृतीशील सहज कर्मयोगाची दृष्टीच स्वामी विवेकानंदानी दिली " असे अभ्यासू मत विविध संदर्भासह सुहास लिमये यांनी केले. विश्व संवाद केंद्र आणि लोक ऊत्कर्ष समिती आयोजित नारद जंयती ऊपक्रमात त्यांनी आपले विचारपुष्प गुंफले.करवीर नगर वाचन मंदिरात झालेल्या या सोहळळ्यात " स्वामी विवेकानंदाचे राष्ट्र निर्माणातील योगदान या विषयावर अभ्यासक लिमये यांनी आपले हितगुजपर मनोगत व्यक्त केले. प्रांरभी सर्वोचे स्वागत समन्वयक अनिरुध्द कोल्हापूरे यांनी केले.मुख्य वक्ते व पाहुण्याचा परिचय सुत्र संचालक डाँ.सदानंद राजवर्धन यांनी करुन दिला. आपल्या भाषणात लिमये यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील देश - विदेशातील विविध महत्त्वाचे प्रसंग नमूद करत ,त्यांनी कोणत्याही परिस्थितीत आपली विज्ञान निष्ठा कधीच सोडली नाही ऊलट भारतीय वेंदान्तामधूनच जगाला अंतिम सत्य समजेल ,हे ठामपणे सांगत सेवाभावातील कर्मयोग ही विज्ञाननिष्ठपणे पटवून दिला असेही मत व्यक्त केले. यावेळी जिल्हा पत्रकार संघटनेचे संस्थापक सुधाकर निर्मळे आणि पत्रकार राजेंद्र मकोटे यांचा गौरव वक्ते सुहास लिमये व रा.स्व .संघाचे विभागीय सदस्य मुंकुंद भावे यांचे हस्ते करण्यात आला तसेच विविध दैनिके - वृत्तवाहिन्याच्या पत्रकार - प्रतिनिधी ना पुस्तक संच देण्यात आले.या सोहळ्यास डाँ.विक्रम राजाज्ञा , र्कीतीराज देसाई ,आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ पंच भारत चौगुले - ऊत्कर्ष लोमटे , सुलोचना नार्वैकर - गांधीनगर ,सुनील पंडीत - वडणगे ,तेजस्वीनी हराळे , केदार जोशी ,वृंदा सावेकर ,तेजास्विनी गायकवाड सह विविध क्षेत्रातील मान्यवर ऊपस्थित होते.
Comments
Post a Comment