भाजपा जिल्हा संघटन आढावा बैठक उत्साहात संपन्न

सिटी न्यूज़
             भाजपा जिल्हा संघटन आढावा बैठक उत्साहात संपन्न 


            कोल्हापूर दि. २६ भारतीय जनता पार्टीचे सध्या देशपातळीवर “संघटन पर्व” हे विस्तृत अभियान सुरु आहे. तसेच नव सदस्य नोंदणी मोहीम देखील सुरु आहे. त्याचबरोबर येत्या काळात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासर्व पार्श्वभूमीवर भाजपा राष्ट्रीय सह संघटन मंत्री मा.व्ही.सतीशजी हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी रेल्वे स्थानकावर त्यांचे स्वागत जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांनी केले. आज विशेष करून मा.व्ही.सतीशजी व प्रदेशाध्यक्ष नाम.चंद्रकांतदादा पाटील यांनी सदर बाजार परिसरातमध्ये सकाळी ९ वाजता व्यक्तीश: घरो-घरी जाऊन भाजपा सदस्य नोंदणी अभियान राबवले. त्यानंतर मा.व्ही.सतीशजी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच कोल्हापूर भाजपा जिल्हा कोअर कमिटीची महत्वाची बैठक संपन्न झाली. यानंतर भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत आज सकाळी १० वाजता रामकृष्ण हॉल, मार्केट यार्ड, कोल्हापूर याठिकाणी कोल्हापूर जिल्हा भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, शक्ती केंद्र प्रमुख यांची व्यापक आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी भारतामाता प्रतिमा पूजन व कार्यक्रम दीप प्रज्वलन राष्ट्रीय सह संघटन मंत्री मा.व्ही.सतीशजी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.चंद्रकांतदादा पाटील, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आम.सुरेश हाळवणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय सह संघटन मंत्री मा.व्ही.सतीशजी यांचे स्वागत महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आम.सुरेश हाळवणकर यांनी केले. तसेच प्रदेशाध्यक्ष मा.नाम.चंद्रकांतदादा पाटील यांचे स्वागत भाजपा शहर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे व ग्रामीण जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके यांनी केले. यावेळी व्यासपिठावर भाजपा प्रदेश चिटणीस मकरंद देशपांडे, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे, पश्चिम महाराष्ट्र  देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, आम.अमल महाडिक, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, महानगर सरचिटणीस विजय जाधव, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, भाजपा ग्रामीण संघटन सरचिटणीस बाबा देसाई, जिल्हा परिषद अध्यक्ष सौ शौमिका महाडीक व राज्य लेखा समिती अध्यक्ष अॅड सचिन पटवर्धन उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विवेचन महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आम.सुरेश हाळवणकर यांनी केले. त्यांनी येणा-या काळात संघटन पर्व या पक्षाच्या कार्यक्रमात सर्व कार्यकर्त्यांनी तन-मन-धन देऊन पूर्ण वेळ काम करण्याविषयी सूचना देऊन विधानसभा निवडणुकीचे कार्यक्रम सर्वाना समजावून सांगितले.
संघटन आढावा बैठकीसाठी विशेष मार्गदर्शनासाठी आलेले राष्ट्रीय सह संघटन मंत्री मा.व्ही.सतीशजी यांनी कार्यकर्ताना संबोधीत केले. त्यांनी सर्वात प्रथम भाजपा संघटन स्थिती व उपस्थित शक्ती केंद्र प्रमुख, लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांच्याशी वैचारीक बातचीत प्रश्न-उत्तर या माध्यमातून व्यक्तीश: केली. यावेळी शक्ती केंद्र व बूथ प्रमुखाचे कर्तव्य, कामकाज या पद्धती विषयी त्यांनी माहिती दिली. तसेच यावेळी लोकप्रतिनिधी, नगरसेवक, जि.प.सदस्य, प.स.सदस्य यांनी केलेल्या कामकाजाचा आढावा त्यांच्याकडून घेण्यात आला. यानंतर मा.व्ही.सतीशजी यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले, लोकसभेतले भाजपाचे यश हे कार्यकर्ता व संघटन बांधणी यातून प्राप्त झाले आहे. येत्या काळात विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना सर्व समाज व सामान्य जनता यांना पक्षा बरोबर जोडण्याचे काम सर्वांनी करावे असे आवाहन उपस्थितांना केले. तसेच पक्ष विचारधारा, पक्ष शिस्त आणि सरकारचे कामकाज याविषयी त्यांनी अतिशय मौल्यवान मार्गदर्शन केले.
यावेळी आढावा बैठक समारोपाचे मार्गदर्शन महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री व नूतन भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.नाम.चंद्रकांतदादा पाटील कार्यकर्त्यांना केले.  संघटनवाढीसाठी आणि येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजची जिल्हा भाजपा आढावा बैठक घेण्यात आलेली आहे. सध्याचा काळ भाजपाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. सर्वांनी जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे. नवीन सदस्य नोंदणी व नव मतदार नोंदणी याविषयी ताकदीने काम करण्याविषयी त्यांनी सूचना केल्या. पक्ष वाढीसाठी नवीन लोकांचे प्रवेश व समाज मेळावे घेऊन जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी भाजपा संघटन व पदाधिका-यांनी तयार राहण्याच्या सूचना त्यांनी केल्या. त्यानुसार ९ ऑगस्ट रोजी राज्यभर सदस्य नोंदणी, १ ते १० ऑगस्ट शक्ती सन्मान रक्षा बंधन कार्यक्रम व १६ ऑगस्ट रोजी स्वर्गीय भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रथम स्मृती दिन यासह अनेक विषयाबद्दल त्यांनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या. प्रदेशाध्यक्ष मा.नाम.चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्वांना विधानसभा निवडणूक यशस्वी रित्या जिंकण्यासाठी उत्साह वर्धक मार्गदर्शन देऊन कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण केला. तेसच त्यांनी यावेळी महाराष्ट्राट राज्य लेखा समिती अध्यक्ष अॅड सचिन पटवर्धन यांना पदवीधर निवडणुकीविषयी माहिती देण्याविषयी सांगितले त्यानुसार  अॅड सचिन पटवर्धन यांनी या पदवीधर निवडणुक नोंदणी प्रक्रीये संदर्भात सर्वांना मार्गदर्शन केले व स्क्रीन द्वारे पदवीधर फॉर्म कसा भरला जावा याविषयी माहिती सांगितली तसेच हे फॉर्म आज सर्वांना उपलब्ध करून दिले.
यावेळी जिल्ह्यातील १० तालुक्यातील शक्ती केंद्र प्रमुख, भाजपा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच भाजपा महानगर शक्ती केंद्र प्रमुख, भाजपा जिल्हा पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते हजारोच्या संख्येने उपस्थित होते. सदरची आढावा बैठक उत्साहात संपन्न झाली व मान्यवरांचे आभार जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी मानले. यानंतर राष्ट्रगीत होऊन कार्यक्रम संपन्न झाला.

Comments