भाजपाच्या वतीने विविध मागण्यांसाठी प्रादेशिक वाहतूक अधिकारी मा.डॉ.अल्वारिस यांना निवेदन सादर

सिटी न्यूज़
भाजपाच्या वतीने विविध मागण्यांसाठी प्रादेशिक वाहतूक अधिकारी मा.डॉ.अल्वारिस यांना निवेदन सादर

कोल्हापूर दि.२४
      भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्यावतीने अवजड वाहतूक संबंधित विविध मागण्यांचे निवेदन भाजपा कोल्हापूर अध्यक्ष मा.राहूल चिकोडे यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर प्रादेशिक वाहतूक अधिकारी मा.डॉ.अल्वारिस यांना देण्यात आले. जिल्हाध्यक्ष श्री राहूल चिकोडे यांनी या निवेदना मागची भूमिका स्पष्ट करून अवजड वाहन परवान्याप्रश्नी लवकरात लवकर निर्णय करावा अशी मागणी केली.  याप्रसंगी पुढीलप्रमाणे मागण्या मांडण्यात आल्या.
1) अवजड परवाना (हेवी लायसेन्स) नूतनीकरणाचेवेळी जो फॉर्म नं.५ भरावा लागतो तो भरणेची सक्ती रद्द करावी.
2) अवजड वाहन (ट्रक व इतर नॉन ट्रान्सपोर्ट वाहने) स्क्रॅप करतेवेळी भरावे लागणारे कर (इन्शुरन्स व पासिंग दंड) माफ करणेत यावा.
3) जुनी वाहने खरेदीदारांवर (राज्यातील व परराज्यातील) पूर्वीचे वाहन मालकावर असलेल्या ऑनलाईन केसीससाठी नवीन मालकांना जबाबदार न धरता त्यांचे आपले कार्यालयातील कामकाजात अडथळा निर्माण करू नये.
4) कच्चे लायसेन्स काढतेवेळी अर्जदारास ऑनलाईन तारीख मिळणेसाठी दिड ते दोन महिनेचा कालावधी लागतो त्यामध्ये सुधारणा होवून तारीख १५ ते एक महिन्यात मिळावी.
याप्रसंगी भाजपा उपाध्यक्ष गणेश देसाई, भाजपा ट्रान्सपोर्ट आघाडी अध्यक्ष सयाजी आळवेकर, राजारामपूरी मंडलचे ट्रान्सपोर्ट आघाडीचे अध्यक्ष दिलिप बोंद्रे यांनी परिवहन अधिकारी डॉ.अल्वारिस यांच्यासमोर आपली भूमिका मांडून या विषयातील अडचणी निदर्शनास आणून दिल्या.     
डॉ.अल्वारिस यांनी भाजपा शिष्ठमंडळाने केलेल्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी भाजपा सरचिटणीस दिलीप मेत्राणी, उपाध्यक्ष मारुती भागोजी, चंद्रकांत घाटगे, अॅड.संपतराव पवार, रविंद्र मुतगी, बापू राणे, दिलीप बोंद्रे, अक्षय निरोखेकर, मामा कोळवणकर, उमेश निरंकारी, संतोष गुरव, मुकेश लाटे, प्रवीणचंद्र शिंदे, विजय गायकवाड, महादेव बिरजे, बाळासाहेब पाटील, बंडू भोसले आदी उपस्थित होते. 

Comments