TikTok आणि Helo अ‍ॅप होणार बंद ?

सिटी न्यूज़


                                               TikTok आणि Helo अ‍ॅप होणार बंद ?


मुंबई १९ :       टिक टॉक या अ‍ॅपची सध्या तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. टिकटॉक आणि हॅलो अ‍ॅपवर बंदी येण्याची शक्यता आहे. सरकारने या दोन्ही अ‍ॅप्सना नोटीस पाठवली आहे. यामध्ये त्यांना 21 प्रश्न विचारण्यात आले आहेत. जर या प्रश्नांना योग्य उत्तरं मिळालीनाहीत तर टिकटॉक आणि हॅलो अ‍ॅपवर बंदी येऊ शकते. स्वदेशी जागरण मंचाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना टिकटॉक आणि हॅलोसारख्या सोशल मीडिया अ‍ॅपवर बंदी घालण्यात यावी यासाठी एक पत्र लिहिलं आहे. हे दोन्ही अ‍ॅप राष्ट्राच्या विरोधात असल्याचं म्हटलं आहे. समाजाला यापासून धोका असल्याने या अ‍ॅपवर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे.याआधी टिकटॉकच्या माध्यमातून आत्महत्या आणि गुन्हेगारीला प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप करत टिकटॉकवर बंदी आणावी अशी मागणी करण्यात आली होती.  तसेच काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने गुगल आणि अ‍ॅपला प्ले स्टोअरमधून टिकटॉक अ‍ॅप हटविण्यास सांगितले होते.  प्रसिद्धीसाठी अनेक जण विविध विषयांवरील आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट करत असतात. असाच एक आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करणं काही दिवसांपूर्वी पाच तरुणांच्या अंगलट आलं होतं.  मुंबईतील पाच तरुणांनी टिक टॉकवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. वादग्रस्त व्हिडीओ अपलोड केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.. 

Comments