महापुरग्रस्त व्यापारी- उद्योजकाना महानगरपालिकेने सत्वर एक लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी : शिवसेनेची शिष्टमंडळावतीने मागणी
सिटी न्यूज़
महापुरग्रस्त व्यापारी- उद्योजकाना महानगरपालिकेने सत्वर एक लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी : शिवसेनेची शिष्टमंडळावतीने मागणी कोल्हापूर --
महापुरामध्ये मध्ये नुकसान झालेल्या व्यापारी - दुकानदार यांना महानगरपालिकेच्या वतीने सत्वर प्रत्येकी एक लाख रुपये मदत घ्यावी , महा पूरग्रस्त रहिवाशी , व्यापारी , उद्योजक यांना आगामी तीन वर्षाचे घरफाळा परवाना शुल्क माफ करावे , पूरग्रस्त भागातील घरांच्या दुरुस्तीसाठी एक खिडकी परवाना पद्धत सुरू करावी आणि महापुरानंतर उपाययोजनांसाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी या मागण्यांचे निवेदन शिवसेनेच्या वतीने आज महानगरपालिका डाँ.मल्लीनाथ कलशेट्टी यांना देण्यात आले शिवसेना जिल्हाप्रमुख आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे ऊपाध्यक्ष संजय पवार , दत्ताजी टिपुगडे सुजित चव्हाण , मंजीत माने , माजी आमदार सुरेश साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली व्यापक शिष्टमंडळाने हे निवेदन त्याला दिले. यावेळी शिवसेनेच्या वतीने सफाई कामगारांना आवश्यक असणारे वैद्यकीय साहित्य तसेच हातमोजे देण्यात आले महानगरपालिकेने आरोग्य पाणी आणि कचरा व्यवस्थापनासाठी युद्धपातळीवर यंत्रणा उभी केली आहे त्याची व्याप्ती वाढवावी अशी अपेक्षाही यावेळी संजय पवार यांनी व्यक्त आली.या मागण्याचा सकारात्मक पाठपुरावा कारण्याचे या वेळी बोलताना आयुक्त डाँ,कलशेट्टी यांनी सांगितले . या शिष्टमंडळामघ्ये कमलाकर जगदाळे , शिवाजी यादव ,राजेंद्र पाटील ,दिलीप देसाई ,रंजीत आयरेकर ,धनाजी यादव, दिनेश परमार आदींचा समावेश होता.
Comments
Post a Comment