कोल्हापूरला पुन्हा एकदा स्वत:च्या पायावर उभं करायचय :युवा सेना अध्यक्ष मा.आदित्य ठाकरे

सिटी न्यूज़ 
कोल्हापूरला पुन्हा एकदा स्वत:च्या पायावर उभं करायचय :
शिवसेना नेते, युवा सेना अध्यक्ष मा.आदित्य ठाकरे




                कोल्हापूर दौऱ्यावर बापट कॅम्प, आंबेवाडी, चिखली, परिसरास भेट व पूरग्रस्तांना मदतीचे वाटप  
कोल्हापूर दि.२० : सर्वच बाबतीत सुजलाम सुफलाम असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यावर यावर्षी नैसर्गिक आपत्ती कोसळली असून, या जिल्ह्यातील लाखो नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या भागात शिवसेनेसह इतर संघटनाच्या कडून मदतीचा ओघ सुरु असून, कोल्हापूर पुन्हा एकदा स्वत:च्या पायावर उभं करायचं आहे, असे प्रतिपादन शिवसेना नेते, युवा सेना अध्यक्ष मा. आदित्यजी ठाकरे यांनी केले. कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली, कराड आदी भागातील पूरग्रस्त नागरिकांना भेटी देण्याकरिता ते दोन दिवसांच्या कोल्हापूर आणि सांगली जिल्हा दौऱ्यावर आहेत.
            आज सकाळी शिवसेनेच्या वतीने शिवसहाय्य योजनेत सुरु असलेल्या मदत कार्यात ते सहभागी झाले. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून आज शहरातील बापट कॅम्प येथे पूरग्रस्तांना जिवनावश्यक साहित्याच्या मदतीचे वाटप शिवसेना नेते, युवा सेना अध्यक्ष मा. आदित्यजी ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते, युवा सेना अध्यक्ष मा. आदित्यजी ठाकरे यांनी बापट कॅम्प येथील पूरग्रस्त कुंभार बांधवांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्यांना सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली.
            यावेळी कुंभार समाजाच्या वतीने माजी महापौर मारुतीराव कातवरे यांनी पूरग्रस्त नागरिकांच्या मागण्या मांडल्या.
            यानंतर बोलताना शिवसेना नेते, युवा सेना अध्यक्ष मा. आदित्यजी ठाकरे यांनी, हि मदत नसून शिवसेनेचे कर्तव्य असल्याचे सांगितले. नैसर्गिक आपत्तीतून सावरण्यासाठी शिवसेना सर्वतोपरी मदत करत आहे. पूर भागात सर्वच ठिकाणी नुकसान झाले आहे तिथे शिवसैनिक पोहचून मदत करत आहोत. अनेक ठिकाणी रस्ते, डोंगर खचले आहेत, अनेक घरांचे नुकसान झाले आहे, अशा सर्वच नागरिकांना सावरण्यासाठी शिवसैनिक पुढे आहेत त्यांना साथ देण्यासाठी आम्ही कोल्हापूर दौरा करीत आहोत. सरकार कडूनही मदत कार्य सुरु आहे. काल आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने २४ मागण्यांचे निवेदन आरोग्य मंत्री नाम.एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना पोहचविले आहे. यातील बर्याच मागण्या मा.मुख्यमंत्री महोदयांनी मान्य केल्या आहेत. त्याची लवकरात लवकर अंबलबजावणी व्हावी, यासाठी शिवसेनेचे सर्व मंत्री, खासदार, आमदार प्रयत्नशील आहेत. हि मदत जेवढ्या लवकरात लवकर मिळेल यासाठी शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धवजी ठाकरे साहेब प्रयत्न करीत आहेत.
            झालेले नुकसान अतिप्रचंड प्रमाणात असून, महाराष्ट्र राज्यासह पंजाब, केरळ, आसाम, कर्नाटक या राज्यातही पूरस्थिती गंभीर असल्याने ही राष्ट्रीय आपत्ती घोषित होण्याची शक्यता आहे. यामध्ये नागरिकांच्या घरांसह, व्यापारी, शेतकरी बांधवांच्या मालाचे नुकसान झाले आहे. यासाठी नुकसान भरपाई देण्याची मागणी आम्ही केली आहे. हा हवामानातील बदल एक चिंतेची बाब असून, पुढील काळात अशा आपत्तीचा सामना करण्यासाठी पूर्वनियोजित उपाययोजना राबवणे गरजेचे आहे. कोल्हापूर जिल्ह्यासह इतर पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या मागे शिवसेना खंबीर उभी असून, पुन्हा एकदा कोल्हापूरला स्वत:च्या पायावर उभं करायचं आहे, असेही शिवसेना नेते, युवा सेना अध्यक्ष मा. आदित्यजी ठाकरे म्हणाले.       
            यानंतर शिवसेना नेते, युवा सेना अध्यक्ष मा. आदित्यजी ठाकरे, आरोग्य मंत्री नाम. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्राथमिक स्वरुपात वैशाली पाडळकर, सुशीला नरतवडे, शालन तारळेकर, यशोदा कुंभार, पार्वती कुंभार या महिलांना शिवसहाय्य मदत पॅकेटचे वाटप करण्यात आले. यानंतर बापट कॅम्प परिसरातील ३३५ पूरबाधित नागरिकांना या मदतीचे वाटप करण्यात आले.
            यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, शिवसेना संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, खासदार राजन विचारे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, युवा सेनेचे उपाध्यक्ष पवन जाधव, शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, कुंभार समाजाचे सतीश बाचणीकर, संभाजी माजगावकर, अनिल निगवेकर, प्रकाश तारळेकर, डॉ. प्रकाश कुंभार आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
            यानंतर शिवसेना नेते, युवा सेना अध्यक्ष मा. आदित्यजी ठाकरे यांनी आंबेवाडी व चिखली या गावांना भेट दिली. आंबेवाडी येथील हनुमान मंदिर आणि चिखली येथील डी.एड. कॉलेज येथे येथे पूरग्रस्त नागरिकांना साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते, युवा सेना अध्यक्ष मा. आदित्यजी ठाकरे यांनी ग्रामस्थांच्या व्यथा ऐकून घेतल्या व त्या सोडविण्याची ग्वाही दिली. यावेळी आरोग्य मंत्री नाम. एकनाथ शिंदे, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्षआमदार राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रदीप नरके आदी उपस्थित होते. 

Comments