सिटी न्यूज़
भाजपा कोल्हापूरच्यावतीने “मन की बात” कार्यक्रम सात मंडलामध्ये संपन्न
कोल्हापूर दि.२५ पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकालातील तिसरा मन की बात कार्यक्रम आज रविवार दिनांक २५/०८/२०१९ रोजी पार पडला. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी हा कार्यक्रम होत असतो. एखादे सांस्कृतिक, सामाजिक व ऐतिहासिक वैशिष्ट्य सामान्य नागरिकांच्या मोठ्या सहभागातून सुरु असलेले एखादे अभियान, नागरिकांच्या विधायक सूचना तसेच आगामी काळात संपूर्ण देशभरामध्ये करावयाच्या विशिष्ठ कार्याची माहती पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी “मन की बात” या कार्यक्रमाच्या माध्यमातून देत असतात. आज भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्यावतीने शहरातील सात मंडलामध्ये “मन की बात” कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरवातीला देशाचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्याचबरोबर त्यांच्या संसदीय कामाची चित्रफित यावेळी उपस्थितांना दाखवण्यात आली. २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांची १५० वी जयंती होत असून यानिमित्याने ११ सप्टेबर पासून प्रत्येकाने वैयक्तिक सहभागाने करावयाचे स्वच्छता अभियान, संपूर्ण प्लास्टिक मुक्ती संकल्प, वन्यजीव संवर्धन कार्यक्रम आणि राष्ट्रीय खेल दिवस पासून सुरु होणाऱ्या हेल्दी इंडिया अभियानाची माहती आजच्या मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी दिली.
जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी सात मंडलांमध्ये उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी आजच्या मन की बात कार्यक्रमाच्या निमित्याने पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या स्वच्छता व प्लास्टिक बंदी विषयासंदर्भात कार्यकर्ते व पदाधिकारी यांना आपल्या घरातून तसेच प्रभागातून या अभियानाची सुरुवात करावी तसेच कापडी पिशव्या वापरण्याबाबत नागरिकांमध्ये प्रबोधन करावे त्याचबरोबर ‘स्वच्छता ही सेवा’ हे अभियान ११ सप्टेंबरपासून प्रत्येक वॉर्डामध्ये हाती घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
शिवाजी पेठ येथे नेसरीकर वाडा, मंगळवार पेठ येथे सणगर गल्ली तालीम, उत्तरेश्वर पेठ येथे रेगे तिकटी, शाहूपुरी येथे शाहूपुरी तालीम, राजारामपुरी मंडल मध्ये करवीर प्रशाला विक्रमनगर, लक्ष्मीपुरी मंडल येथे भाजपा कार्यालय आणि कसबा बावडा येथे लाईन बाजार चौक याठिकाणी कार्यक्रम संपन्न झाले.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, आमदार अमल महाडिक, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, विजय जाधव, दिलीप मेत्राणी, आर.डी.पाटील, नगरसेवक अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे, मारुती भागोजी, राजाराम शिपुगडे, संतोष माळी, भरत काळे, संदीप कुंभार, इकबाल हकीम, हेमंत कांदेकर, प्रग्नेश हमलाई, मामा कोळवणकर, रविंद्र मुतगी, बापू राणे, देवदास औताडे, विवेक कुलकर्णी, चंद्रकांत घाटगे, राहूल पाटील, भारती जोशी, सुलभा मुजूमदार, सयाजी आळवेकर, अप्पा लाड, प्रभा इनामदार, आसावरी जुगदार, वैशाली पोतदार, शशिकांत रणवरे, अश्विनी नितीन पाटील, दिलीप बोंद्रे, तानाजी निकम, महादेव बिरंजे, नचिकेत भुर्के, विजय आगरवाल, विशाल शिराळकर, मंगला निप्पाणीकर, हर्षद कुंभोजकर आदींसह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment