सिटी न्यूज़
हिंद केसरी ते आयर्नमॅन अशी कोल्हापूरची अभिमानाची क्रीडा परंपरा : क्रीडादिन सोहळ्यात पै. विष्णू जोशीलकर यांचे प्रतिपादन
कोल्हापूर। प्रतिनिधी
राजर्षी शाहूंच्या काळापासून क्रीडा विश्वाला नेहमीच प्रोत्साहन लाभले आहे. कुस्ती विश्वातील प्रतिष्ठतेच्या हिंद केसरी पदापासून बुद्धिबळ, नेमबाज, स्विमिंग ते आता आयर्नमॅनपर्यंत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर कोल्हापूरच्या क्रीडा विश्वाने आपला दबदबा निर्माण केला आहे. आपला राष्ट्रीय खेळ हॉकीला सुवर्ण काळ देणाऱ्या मेजर ध्यानचंद यांचा 29 ऑगस्ट हा जन्मदिन हा राष्ट्रीय क्रीडादिन म्हणून साजरा करत असताना कोल्हापूरच्या क्रीडा विश्वाला अधिक गती मानता देण्याचा निर्धार आपण सगळेजण क्रीडा स्तंभाच्या साक्षीने करूया असे भावपूर्ण मनोगत महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू जोशीलकर यांनी व्यक्त केले. भवानी मंडप येथे झालेल्या शाहू मॅरेथॉन सर्कल आयोजित सोहळ्यात ते बोलत होते.
राष्ट्रीय क्रीडा दिन निमित्ताने शाहू मॅरेथॉन तर्फे मेजर ध्यानचंद यांच्या समर्थनार्थ ऐतिहासिक भवानी मंडपातील गुरुवारी सकाळी क्रिडा स्तंभास अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय स्तरावर आयर्न मॅन स्पर्धेतील विजेत्या 12 जणांचा सत्कार जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे ,अध्यक्ष किसन भोसले तसेच महाराष्ट्र केसरी विष्णु जोशीलकर, विजय मोरे यांच्या हस्ते करण्यात आला.यामध्ये आंतरराष्ट्रीय आयर्न मॅन किताब विजेते सर्वश्री उत्तम फराकटे, वरूण कदम, यश चव्हाण, अतुल पवार,वैभव बेळगावकर, अमर धामणे, कुमार बिजवानी, बाबासाहेब पुजारी आणि सुप्रिया निंबाळकर यांच्यासह प्रशिक्षक उदय पाटील यांचा समावेश होता.
यावेळी क्रीडा अधिकारी शचंद्रशेखर साखरे यांनी बोलताना खेळाडू आणि क्रीडा विश्वाचा सन्मान करणारा हा कोल्हापूरचा क्रीडास्तंभ हा सर्वांचा मानबिंदू आहे. या क्रीडास्तंभासह परिसराचे लवकरच आधुनिक पद्धतीने सुशोभिकरण करण्यात येईल असे अभिवाचन दिले. सत्कारमूर्तीच्यावतीने आभार मानताना आयर्न मॅन उत्तम फारकटे यांनी पूर्ण आशिया खंडात आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठतेचा आयर्न मॅन किताब असणारे 31 जण कोल्हापूर शहरात आहेत. त्यामूळे कोल्हापूरची आयर्न मॅन सिटी म्हणून नवी अभिमानाची ओळख निर्माण झाली आहे आणि या ऐतिहासिक ठिकाणी झालेल्या सत्काराने याची व्यापकता भविष्यात वाढणार आहे असे नमूद केले.
प्रारंभी अध्यक्ष किसन भोसले यांनी सर्वांचे स्वागत करत क्रीडा दिनाची माहिती देऊन 25 व्या वर्षात पदार्पण केलेल्या शाहू मॅरेथॉनमध्ये सर्व आयर्न मॅन सत्कार मूर्तींनी सहभागी व्हावे असे आवाहन केले. कार्याध्यक्ष चंद्रकांत झूरळे यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून आभार मानले. सूत्र संचालन राजेंद्र मकोटे यांनी केले. यावेळी जेष्ठ फुटबॉल खेळाडू सुरेश पाटील, बाबु घाडगे, बबन देशपांडे, लालासाहेब गायकवाड यांचेसह बिनखांबी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते संपतराव जाधव, बाळासाहेब पाटील, द्वारकानाथ नायडू, उदय घोरपडे, मधु बिरजें, नरेंद्र इनामदार, चंद्रकांत जाधव, दत्ताजी कदम, विजय सासने यांचेसह खेळाडू व विद्यार्थी उपस्थित होते .
आज दिवसभर महाराष्ट्र हायस्कुल, न्यू कॉलेज, गोखले कॉलेजसह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने या ऐतिहासीक क्रीडा स्तंभाजवळ येऊन मिरवणुकीने अभिवादन करण्यात आले.

Comments
Post a Comment