रोटरी चे नवनिर्वाचित प्रांतपाल संग्राम पाटील यांच्या कार्योलयाचा आरंभ

सिटी न्यूज़
रोटरी चे  नवनिर्वाचित प्रांतपाल संग्राम पाटील यांच्या कार्योलयाचा  आरंभ 


               प्रभावी कामासाठी सचिवांची भूमिका मोलाची : रो.जाँन्सन फर्नांडिस   
कोल्हापूर -- प्रतिनिधी --
                   सेवाभावी कार्योत मानदंड ऊभा केलेल्या कोल्हापूर सांगली उत्तर कर्नाटक गोवा राज्य असा कार्यक्षेत्र असलेल्या रोटरी  इंटरनॅशनल च्या आगामी नवनिर्वाचित प्रांतपाल पदी निवड झालेल्या कोल्हापूरच्या  संग्राम पाटील यांच्या कार्योलयाचा आंरभ खास गोव्याहून आलेले  माजी प्रांतपाल  रोटेरियन जॉर्सन फर्नांडिस यांच्याहस्ते मान्यवरांच्या हस्ते संपन्न दीपप्रज्वलनाने संपन्न झाला.  यावेळी माजी प्रांतपाल प्रताप पुराणिक,  वासुदेव देशिंगकर , नितीन मिरजे,  निवास मालू सहा  नवनिर्वाचित 50 सेक्रेटरी सचिव उपस्थित होते.    सायंकाळी झालेल्या  नवोदित सचिवांच्या स्नेहमेळाव्यात ज्येष्ठ रोटरीयन ,  माजी प्रांतपाल डॉक्टर जॉर्सन फर्नांडिस यांनी आपल्याला अनुभव आणि व्यासंगाच्या आधारे  मार्गदर्शन केले .संघटनेची ध्येय धोरणे आणि व्यवहारिक उपलब्ध कुशल  मनुष्यबळाचा योग्य वापर आणि या सर्वांची मोट बांधणारे  सचिव हेच आपल्या क्लबला  आणि संघटनेला अगदी भक्कम  बनवून प्रभावीपणे काम करू शकतात ,असे सांगत त्यांनी समर्पित भाव ,  ज्ञान आणि कौशल्याचा समन्वयी  सदुपयोग हे सचिवाच्या ठिकाणी असणे गरजेचे आहे असे मनोगत त्यांनी व्यक्त केले  .                                     आपल्या प्रांतापाल पदाच्या पुढच्या काळात  प्रतिभावान आणि रचनात्मक  दृष्टी असलेले हे सर्व सचिव आपणास मोलाची साथ देतील आणि आपण पातळीवर दखल पत्राची काम करू विश्वास यावेळी संग्राम पाटील यांनी व्यक्त केला .या सोहळ्यास सौ.उत्कर्षा पाटील आनंद कुलकर्णी डॉक्टर गिरी,  अमर पाटील आदीसह रोटरी व ऊघोग -  सामाजिक विश्वातील मान्यवर उपस्थित होते.

Comments