विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर रविवारी दि.१५ रोजी शिवसेनेचा निर्धार मेळावा    

सिटी न्यूज़ 
              विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर रविवारी दि.१५ रोजी शिवसेनेचा निर्धार मेळावा  
 

कोल्हापूर दि.१३ :
         लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभेच्या जागांवर शिवसेनेने विजय मिळविला आहे. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे सहा आमदार व दोन खासदार असून शिवसेनेची ताकद वाढली आहे. नुकतेच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाढले असून, कोल्हापूर जिल्ह्यातील दहाही मतदार संघात शिवसेना भाजप युतीचे उमेदवार निवडून पुन्हा विधानसभेवर भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिक सज्ज आहेत. विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर रविवारी दि.१५.०९.२०१९ रोजी ठीक सकाळी ११.०० वाजता केशवराव भोसले नाट्यगृह, खासबाग, कोल्हापूर येथे शिवसेना पदाधिकारी निर्धार मेळाव्याचे, नूतन खासदार श्री. संजय मंडलिक, भाजप प्रदेशाध्यक्ष पदी निवड झालेले पालकमंत्री नाम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या सत्काराचे आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे. या मेळाव्याच्या नियोजनाकरिता आज शिवसेना शहर कार्यालय शनिवार पेठ येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
      यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, यावर्षी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात दोन खासदार निवडून आले असून, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचा खासदार करण्याचे स्वप्न शिवसैनिकांनी पूर्ण केले आहे. या अभूतपूर्व यशाबद्दल शिवसेना शहर कार्यकारणीच्या वतीने नूतन खासदार मा.संजय मंडलिक यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. याचबरोबर भाजप प्रदेशाध्यक्ष पदी नेमणूक झाल्याबद्दल महसूल मंत्री नाम.चंदकांतदादा पाटील यांचाही सत्कार शिवसेनेच्यावतीने करण्यात येणार आहे. त्याचबरोबर हिंदुहृद्यसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख वंदनीय उद्धवजी ठाकरे आणि युवा सेना अध्यक्ष मा.आदित्यजी ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने गेली दहा वर्षात कोल्हापूर उत्तर विधान सभा मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. शिवसेनाप्रमुखांच्या शिकवणी प्रमाणे जनतेला न्याय देण्याचे काम केल्याने २००९ मध्ये शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धवजी ठाकरे यांनी पहिली संधी दिली. शिवसैनिकांच्या बळावरच ही निवडणूक जिंकली. त्यानंतर आंदोलनांच्या, विधानसभेच्या माध्यमातून काम केल्याने दुसऱ्यांदा पक्षाने संधी दिली. गेल्या पाच वर्षांमध्ये शिवसेना भाजप युतीच्या माध्यमातून कोल्हापूर शहरातील बरेच प्रश्न मार्गी लावण्याची सुवर्णसंधी मिळाली. केवळ आंदोलनच नव्हे तर सकारात्मक भूमिकेने केलेले सामाजिक व विकासात्मक कार्य, अधिवेशनातील काम याचा गेल्या पाच वर्षातील लेखाजोखा मी माझ्या कार्य अहवालाद्वारे जनतेसमोर मांडणार आहे. या कार्य अहवालाचा प्रकाशन सोहळाही याच वेळी पार पडणार आहे. गेले दीड महिना उद्भवलेल्या पूरपरिस्थितीत शिवसेना मदतीत अग्रभागी होती. अजूनही काही प्रमाणात मदतीचे काम सुरु आहे. गेल्या अनेक वर्षात शहरवासियांसाठी केलेल्या कामांचे फळ म्हणून जनतेने २ वेळा संधी दिली आहे. त्याचबरोबर पक्षप्रमुखांचा असलेला विश्वास सार्थ करीत जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहे. आगामी निवडणुकीमध्ये विरोधक कोण याकडे लक्ष न देता आपण केलेल्या कामांच्या शिदोरीच्या जोरावर मतदारांपर्यंत नम्रपणे पोहचवून आपले काम सांगुया. कोणताही जातीवाद, मतभेद न करता आपण काम करीत आहे. त्यामुळे जनता पुन्हा आपल्याला विजयी करेल, असा विश्वासही आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला. यावेळी शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, जेष्ठ पदाधिकारी दीपक गौड, पानपट्टीसेनेचे अरुण सावंत, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष किशोर घाटगे, महावितरण समितीचे अध्यक्ष अमर समर्थ, पद्माकर कापसे, उपशहरप्रमुख विशाल देवकुळे यांनी मनोगते व्यक्त केली. तर आभार उपशहरप्रमुख जयवंत हारुगले यांनी मांडले. यावेळी युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, सामाजिक कार्यकर्ते महेश उत्तुरे, महिला आघाडी शहर संघटक सौ. मंगल साळोखे, सौ.पूजा भोर, सौ.मंगल कुलकर्णी, सौ.सोनाली पेडणेकर, सौ.गीता भंडारी, सौ. गौरी माळदकर, सौ. मीनाताई पोतदार, सौ.शाहीन काझी, सौ.अर्चना भुर्के, सौ. पूजा कामते, रुपाली कवाळे, सौ.पूजा पाटील यांच्यासह फेरीवाले सेनेचे शहरप्रमुख धनाजी दळवी, शिवसेना उपशहरप्रमुख सुनील जाधव, रघुनाथ टिपुगडे, राजू पाटील, अरविंद मेढे, सुनील खोत, अजित गायकवाड,अनिल पाटील, विश्वजित मोहिते, अमित चव्हाण, रणजीत जाधव, दीपक चव्हाण, रमेश खाडे, कमलाकर किलकिले, सुनील भोसले, सनी अतिग्रे, निलेश गायकवाड, गजानन भुर्के, राजू काझी, विनय वाणी, मंदार तपकिरे, अंकुश निपाणीकर, विराज पसारे, कमलाकर किलकिले, राज अर्जुनिकर, विशाल पाटील, रिक्षा सेनेचे अल्लाउद्दीन नाकाडे, सचिन भोळे, कपिल सरनाईक, युवा सेनेचे योगेश चौगुले, अविनाश कामते, विश्वजित साळोखे, पियुष चव्हाण, सौरभ कुलकर्णी, विनय क्षीरसागर आदी शिवसेना युवासेना महिला आघाडी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments