लक्ष्यात राहणारा परफॉर्मन्स

सिटी न्यूज़
                                     लक्ष्यात राहणारा परफॉर्मन्स 

कोल्हापुर १३ : 
          लक्ष्मीकांत   बेर्डे अर्थात आपला सर्वांचा  म्हणजे   तमाम रसिक प्रेक्षकांचा  " लक्ष्या " .  आजवर लक्ष्मीकांत  बेर्डे  यानी वि नोदी  भूमिका  खुप केल्या पण  "अशी  ही बनवाबनवी "  
या चित्रपटातील भूमिका  खूपच  गाजली त्यातील  डोहाळे गीत तर फारच गाजले 
    सध्या पुण्यात स्थित असणारे पंकज हिरूगडे  या आपल्या भागातील युवकने गणेश उस्तवात 
या गीतावर भन्नाट  परफॉर्मन्स   केला 



या परफॉर्मन्स बद्दल  पंकज हिरूगडे कडूनच थोडीशी माहिती 

रस्टीक प्यारेडाईस हौसिंग सोसायटी
चिखली - पुणे
       जिथे मी राहतो, या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे गणेश उत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. वेगवेगळ्या स्पर्धा ही भरवल्या जातात ज्यामध्ये लहानापासून मोठ्यांपर्यंत मोठ्या संख्येने भाग घेतला जातो. डान्स, पारंपरिक वेशभूषा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला, संगीत खुर्ची, अंताक्षरी आणि बरेच काही

वेगळे आणि हटके काहीतरी करायचे म्हणून आणि 90's च्या गाण्यांवरील विशेष प्रेम हे करण्यास भाग पाडले

या सर्वांमध्ये सोसायटी चा उत्स्फूर्त प्रतिसाद, घरच्यांची साथ ही मोलाची होती. बायको आणि वहिनीने केलेला मेकअप मेहुण्याने केलेली हरेक तर्हेची मदत आणि विशेष म्हणजे माझी मुलगी आणि भाचीने केलेला अफलातून डान्समुळे हे सर्वकाही शक्य झाले

पुन्हा काहीतरी नवीन करण्यासाठी आणि सर्वांनी एकत्र आणून त्यांची करमणूक करण्यासाठी चा हा प्रयत्न

Comments

Post a Comment