करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची घटस्थापनेदिवशी त्रिपुरा सुंदरी रुपात पूजा

सिटी न्यूज़

करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची  घटस्थापनेदिवशी त्रिपुरा सुंदरी रुपात पूजा

शारदीय नवरात्र उत्सव 2019




कोल्हापूर २९ -- प्रतिनिधी --
           साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई देवी . देवीची आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेसह त्रिपुरा सुंदरी रुपात विशेष पुजा बांधण्यात आली.श्री पुजक पराग ठाणेकर - प्रसाद लाटकर यांनी हि पूजा बांधली. आदी शंकराचार्य यांनी रचलेल्या त्रिपुर सुंदरी अष्टक या रचने आधारित ही पुजा बांधण्यात आली आहे. जिह्यातील नवरात्री ऊत्सावाचा केंद्र बिंदू असलेल्या महालक्ष्मी मंदिरातआज पहाटे काकड आरती नंतर मंदिर व्यवस्थापक देवस्थान धनाजी जाधव यांनी अभिषेक केला आणि नवरात्री सोहळ्यास विधीवत प्रारंभ झाला. मुख्य मंदिर - गरुड मंडपा समोर ऊभारलेल्या व्यासपीठावर गायिका वैदा सोनुले आणि सहकारी कलाकारानी सहस्त्रनाम पठण केले . यासह याच व्यासपीठावर दिवसभर दत्तप्रसाद भजनी मंडळ , रंगराव गोंधळीआणि सहकारी , रेणुका भजनी मंडळ, बालिंगा येथील ज्ञानेश्वर भजनी मंडळ , सुरभी भजनी मंडळ टाकाळा , नृरसिंहवाडी भक्त मंडळ आदि संस्था-संघटनांनी आपली संगीत सेवा सादर केली. महालक्ष्मी मंदिर परिसरात राजवाडा पोलीस ठाणे यांनी सव्वाशे पोलिसासह बंदोबस्त ठेवला आहे , त्यांना होमगार्ड व्हाईट आर्मी , महालक्ष्मी भक्त मंडळ यांचे सहकार्य लाभत आहे. महालक्ष्मी देवीसह परिसरातील तुळजाभवानी व शनि मंदिरातही तेल अर्पण करण्यासाठी महिलासह भाविकाची मोठी गर्दी केली आहे. रात्री निघालेल्या प्रदक्षीणा पालखी समोर कोल्हापूर पोलीस बँड ने आपले वादन केले. दरम्यान परगांवहून येणारे भाविकाची गैरसोय टाळण्यासाठी स्थानिक भाविकानी मुखदर्शन घेऊन प्रशासनास सहकार्य करावे असे आहवान ही करण्यात आले आहे. मंदिरातील विविध धार्मिक कार्यक्रम व देवी दर्शनाचे थेट प्रक्षेपण भवानी मंडप सह बिंदू चौकात मोठ्या एलईडी वर करण्यात येत आहे. मंदिरानजीकच्या रंकभैरव मंदिरासह भवानी मंदिरातही आज पहिल्या दिवशी विशेष पुजा बांधण्यात आल्या होत्या.


Comments