सिटी न्यूज़
पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शिवसेना सर्वतोपरी मदत करणार : परिवहन मंत्री नामदार दिवाकर रावते
आमदार राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून पूरग्रस्त विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप
कोल्हापूर दि.०६ : सर्वच बाबतीत सुजलाम सुफलाम असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यावर यावर्षी नैसर्गिक आपत्ती कोसळली, या जिल्ह्यातील लाखो नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. यामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्याचेही नुकसान झाले असून, पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शिवसेना सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही परिवहन मंत्री नामदार दिवाकरजी रावते यांनी दिली.
कोल्हापूर शहरातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्याही शैक्षणिक साहित्याचे नुकसान झाले असल्याने, अभ्यास करायचा तरी कसा असा प्रश्न या विद्यार्थ्यांसमोर उभा ठाकला असताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वतीने शहरातील सुमारे ५० शाळांमधील १२ हजार विद्यार्थ्यांना दप्तरांचे व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून आज शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री नामदार दिवाकरजी रावते यांच्या हस्ते विद्यापीठ हायस्कूल येथील १२०० विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप करण्यात आले. कोल्हापूर दौऱ्यावर असणाऱ्या परिवहन मंत्री नामदार दिवाकरजी रावते यांनी करवीरनिवासिनी आई अंबाबाईचे दर्शन घेतले. यानंतर भवानी मंडप येथील विद्यापीठ हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांना या दप्तरांचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना परिवहन मंत्री नामदार दिवाकरजी रावते यांनी, हि मदत नसून शिवसेनेचे कर्तव्य असल्याचे सांगितले. नैसर्गिक आपत्तीतून सावरण्यासाठी शिवसेना सर्वतोपरी मदत करत आहे. पूर भागात सर्वच ठिकाणी नुकसान झाले आहे तिथे शिवसैनिक पोहचून मदत करत आहोत. अनेक नागरिकांचे अतोनात नुकसान झाले त्यांच्यापर्यंत मदत पोहचविली. या पुरामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्यांचेहि मोठे नुकसान झाले. या बाल वयात आपले शिक्षण वाहून गेले अशी खंत त्यांच्या मनावर बिंबू नये, म्हणून आमदार राजेश क्षीरसागर यांनी स्तुत्य कार्यक्रम हाती घेतला. शिवसेना कोणताही भेदभाव न करता पूरग्रस्त नागरिकांच्या पाठीशी ठाम उभी आहेच. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची जाण ठेवून त्यांनाही या संकटातून बाहेर काढण्यासाठी आम्ही सर्वतोपरी मदत करू, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, युवा नेते पुष्कराज क्षीरसागर, युवा सेना महाराष्ट्र राज्य सदस्य हर्षल सुर्वे, जिल्हा समन्वयक अविनाश कामते, योगेश चौगुले, युवा सेना जिल्हा अधिकारी मंजीत माने, शैलेश साळोखे, कपिल सरनाईक, सौरभ कुलकर्णी, अभिजित गोयानी आदी उपस्थित होते.

Comments
Post a Comment