राष्ट्रीय काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी आमदार सतेज पाटील यांची निवड

सिटी न्यूज़ 
राष्ट्रीय काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी आमदार सतेज पाटील यांची निवड  
           




 
  कोल्हापूर  -- प्रतिनिधी -- 
                  विद्यमान  विधानपरिषद सदस्य आणि   गृहराज्यमंत्री पद भूषवलेले सतेज  पाटील यांची कोल्हापूर जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडीचे पत्र त्यांना काँग्रेस राज्य काँग्रेस कमिटीकडून मिळाले आहे  , दोन दिवसापूर्वी या पदाचा  प्रकाश आवाडे यांनी या पदाचा राजीनामा दिला होता. अगदी अल्पावधीतच  घोषित होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी जबाबदारी त्यांच्यावर पक्षाने दिली आहे .   महाराष्ट्र राज्य सरचिटणीस अँड. गणेश पाटील यांनी प्रांताध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या आदेशावरून सतीश उर्फ बंटी पाटील यांची कोल्हापूर ग्रामीण जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याचे घोषित करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत .  गत विधानसभा निवडणुकीवेळी कोल्हापूर दक्षिण मधून  पराभूत अनपेक्षितपणे भाजपा अमोल माने यांच्याकडून महाडिक यांच्याकडून पराभव स्वीकारलेल्या सतीश पाटील यांनी त्यानंतर लगेचच झालेल्या विधानपरिषद निवडणुकांत घवघवीत यश मिळवले होते.  आता आपल्या  पराभवाची परतफेड करण्यासाठी त्यांनी कोल्हापूर दक्षिण मधून आपले पुतणे ऋतुराज पाटील यांची उमेदवारी केली आहे  . नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेना शिवसेनेचे विजय झालेले खासदार संजय मंडलिक यांना " आमचे ठरलय " या ब्रीद वाक्य जाहीरपणे पाठिंबा दिला होता आणि ही त्यांची ही  भूमिका राज्यात चर्चेचा विषय ठरली होती. या पार्श्वभूमीवर खासदार मंडलिक यांनीही  कोल्हापूर दक्षिण साठी सतेज पाटील यांच्यासमवेत असणार असल्याचे घोषित केले , त्या मुळे राजकीय चुरस अधिकच वाढली आहे.    जिल्हाध्यक्षपदाला न्याय देणार -- सतेज पाटील    कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष हे  पद आपण एक सामुहीक आव्हान  म्हणून  म्हणून स्वीकारत आहोत. मोठी पंरपंरा असलेल्या  काँग्रेसच्या ज्येष्ठांच्या आशीर्वादाने आणि आव्हाने स्वीकारणारी सक्षम  युवा पिढी सोबत  जिल्ह्यात काँग्रेसची मोट आपण बांधणार आहोत .  काँग्रेस नेत्या  सोनिया गांधी सह  राहुल गांधी तसेच प्रदेशाध्यक्ष थोरात यांना अपेक्षित असलेली कामगिरी आपण जिल्ह्यात निश्चितच करूच. हा कोल्हापूर जिल्हा पूर्वापार काँग्रेस विचाराचाच आहे त्याची गाव तालुका पातळी पासून नव्या उत्साहाने बांधणी करत विधानसभा निवडणुकीत अग्रेसर राहूच "" अशी प्रतिक्रिया  सतीश पाटील यांनी आपल्या निवडीनंतर दिले आहे.प्रकाश आवाडे यांच्या  अनपेक्षित राजीनाम्याने मरगळ आलेल्या कोल्हापूर  जिल्हा काँग्रेसला नवी उमेद देण्याचे आणि विविध आघाड्याना  सक्रिय करण्याचे  मोठे आव्हान  सतेज पाटील यांचे समोर आहे. जिल्हाध्यक्ष पदावरून ते  कसे पार पडतात या कडे राजकीय विश्वाचे लक्ष आसणार आहे...

Comments