सिटी न्यूज़
कोल्हापूरात रंकाळा र्थी- डि वाँक ला मोठा प्रतिसाद ः दिड हजाराचा सहभागकोल्हापूर -- रविवारी सकाळी दीड हजार कोल्हापुरकर रंकाळा र्थी डी वाँक मघ्ये सहभागी झाले .सुप्रसिद्ध आहार मार्गदर्शक डॉ जगन्नाथ दिक्षित यांच्या प्रेरणेतून या आरोग्य - आहार प्रबोधन मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते.
आज एकाच दिवशी 5 देशात, 20 राज्यात, 192 शहरात आयोजित केला होता . हा उपक्रम कोल्हापूर मध्ये रंकाळा प्रदक्षिणा नावाने राबवण्यात आला,दिवंगत ३० हून आधिक पदव्या घेतलेले डॉक्टर श्रीकांत जिचकार यांच्या जयंती निमित्त आयोजित ह्या उपक्रमाची सुरुवात त्यांना श्रध्दांजली वाहून करण्यात आली. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई , आयुक्त श्मल्लिनाथ कलशेट्टी यांचे हस्ते या प्रदक्षिणा उपक्रमास सुरुवात झाली. उपक्रमाचे आयोजक व प्रायोजक युनिक ऑटोमोबाईल्सच्या राहुल चोरडिया व विशाल चोरडिया यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले, जिल्हाधिकारी साहेबांनी स्वच्छता तर आयुक्तांनी प्लास्टिक मुक्ती संदेश दिला.
या नतंर शालिनी पॅलेस, रंकाळा चौपाटी, संध्यामठ, राज कपूर पुतळा, क्रशर चौक, पतौडी खण, पदपथ पाच किलोमीटर मार्गक्रमण 30 ते ५५मिनीटात पूर्ण केले.या ऊपक्रमात 81 वर्षाचे बाळासाहेब माने आजोबा तसेच 8 वर्षाचा आशिष पोवार आदी सहभागी झाले होते.. काल मध्यरात्री तीन वाजता म्हणजे सर्वात शेवटी संतोष जगताप यांनी नावनोंदणी केली व सकाळी ते सहभागी होवून सर्वात प्रथम प्रदक्षिणा पूर्ण करण्याचा मान मिळवला.
या ऊपक्रमात स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, माजी सभापती आशिष ढवळे, राजसिंह शेळके, सौ रुपा राणी निकम, संजय मोहिते, अशपाक आजरेकर,निवृत्त पोलीस अधिकारी संघटनेचे मदन चव्हाण, असोसिएशन ऑफ आर्किटेक्टचे अजय कोराणे यांचा समावेश होता.हा ऊपक्रम यशस्वी करण्यासाठी युनिक चे प्रणील खाडे यांच्या नेतृत्वाखालील किशोर दाणेकर, वैभव नाईक, किरण श्रेष्ठी, बाबासो पाटील, दीपक देशपांडे, समित रेगे, यांची टीम तसेच ब्रँडबॉक्सच्या हेमंत दळवी यांची टीम, बच्चनवेडे गृपचे राजू नान्द्रे, कुंदन ओसवाल यांनी विशेष परिश्रम घेतले. महिला - युवतीसह ज्येष्ठ नागरिकाचीही यात लक्षणीय ऊपस्थिती होती.


Comments
Post a Comment