सिटी न्यूज़
रंग भावनांचे पुरग्रस्ताच्या मदतीसाठी चित्रप्रदर्शनातील भाव मोलाचे - सतेज पाटील कोल्हापूर -- प्रतिनिधी --
" महापुरग्रस्ताच्या मदतीसाठी संवेदनाशील चित्रकाराचे प्रदर्शन मोलाचे आहे .." या शब्दात आपल्या शुभेच्छा आमदार - काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी आपल्या भावना शुंभारभ प्रंसगी व्यक्त केल्या.कोल्हापूर आर्ट फौंडेशन व कोल्हापूर चित्रकार ग्रुप यांनी कोल्हापुरातील पूरग्रस्त नागरिकांना मदत उपलब्ध व्हावी यासाठी २०० कलाकारांचे 'चित्र-शिल्प प्रदर्शन' छत्रपती शाहू स्मारक येथे आयोजित केले आहे.
या प्रदर्शनातून मिळणारा निधी हा कोल्हापुरातील पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे. हे प्रदर्शन आज रविवार दि. ८ सप्टेंबर ते बुधवार दि. ११ सप्टेंबर पर्यंत खुलं असणार आहे. आज या प्रदर्शनाचे उदघाटन कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त मा. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाले. समन्वयक प्रंशात जाधव यांनी कोणतही चित्रकृती विकत घेऊन रसिकानी पुरग्रस्ताना मदत करण्याचे आहवान करत , आज पहिल्याच दिवशी एक लाख पाच रुपये निधी जमा झाल्याचे सांगितले .
यावेळी, प्रशांत जाधव , अजेय दळवी , संजीव संकपाळ , ईनायत शिडवणकर , नागेश हंकारे , अतुल डाके , मनोज दरेकर , विजय टिपुगडे, मंगेश शिंदे , सुनिल पंडित , विलास बकरे , शिवाजी म्हस्के , बबन माने, सतीश घारगे , स्वप्नील पाटील तसेच अन्य कलाकार व कलाप्रेमी उपस्थित होते.


Comments
Post a Comment