रक्तदान नेत्रदान पाठोपाठ व्यापकप्रमाणात सामाजिक सहभाग वाढण्यासाठी अवयवदान प्रबोधन ची व्याप्ती वाढविणे गरजेचेच आहे असे आग्रही मत ज्येष्ठ मेंदूविकारतज्ञ् डाँ.संतोष प्रभु यांनी व्यक्त केले. विन्स हॉस्पिटल सभागृह मघ्ये शासकिय मान्यताप्राप्त मुंबईतील द फेड्रेशन ऑफ ऑर्गन बॉडी या संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक पुरूषोत्तम पोवार यांचेसह विन्स हॉस्पिटल , साई शक्ती मेडिकल फौंडेशन यांनी याचे आयोजन केले होते. कोल्हापूर प्रेस क्लब ने ही सहसंयोजक यात सहभाग घेतला. प्रांरभी ऊद्घाटन सत्रात आपल्या प्रास्तविकात राजेंद्र मकोटे यांनी कोल्हापूरची मेडीकल हब म्हणून महानगराच्या बरोबरीने कार्यरत राहण्याची पुर्ण क्षमता आहे , पण त्यासाठी प्रशासन - विमान ते स्थानिक वाहातूक - विविध एनजीओ सह विविध वैद्यकीय संस्था - संघटना - मिडीया - शिक्षण संस्था आदी विविध घटकात नियमित समन्वय वाढला पाहीजे , या साठी अश्या कार्यशाळाची संख्या वाढली पाहिजे , असे नमूद केले.साई शक्तीचे धीरज रुकडे यांनी गेली वीस वर्षाहून अधिक काळ अवयवदान या क्षेत्रात कार्यरत असलेल्या द फेडरेशन ऑफ ऑर्गन बाँडी या संस्थेने कोल्हापूर मघ्ये अवयवदानासाठी प्रचंड अनुकुल वातावरणाचा लाभ घेण्यासाठी स्थानिक कार्यकर्ते घडवावेत , यासाठी समन्वयक म्हणून साईशक्ती जबाबदारी घेईल असे अभिवचन देत सगळ्याचे स्वागत केले.आपलाही व्यक्तीगत व संस्थात्मक सहभाग या ऊपक्रमात राहील , असे निवृत्त पोलिस अधिकारी पंढरीनाथ मांडरे यांनी सांगितले.
प्रांरभा नतंर मुख्य मार्गदर्शक पुरूषोत्तम पोवार यांनीमहानगरी मुंबईत समर्पित कार्यकर्ते सह विद्यमान अध्यक्ष हरकचंद साबले यांचे समावेत या क्षेत्रांत गेली १८ वर्षै सुरु असलेल्या आनुभविचा धावता आढावा घेत , पश्चिम महाराष्ट्रातही कार्यविस्तारात डॉक्टर , एमएसडब्ल्यूचे विद्यार्थी तसेच पत्रकार , सामाजिक कार्यकर्ते , परिचारिका , एनजीओ प्रतिनिधी तसेच जेष्ठ नागरिक यांनी सहभागी अशी आग्रही अपेक्षा व्यक्त करत स्लाईड शोसह मोलाचे प्रबोधन केले.आगामी 2020 मघ्ये नाशिक ते बेळगांव या अवयवदान प्रबोधन पदयात्रेची माहीती देत त्यात सहभागी होण्याचेआहवान सुधीर बागाईतकर - सुनील देशंपाडे यांनी केले.नेत्रदानाविषयी मौलिक माहीती डाँ शुभदा कुलकर्णी - कुडतरकर यांनी दिले.सायंकाळी प्रश्नोत्तरे सत्रामध्ये झालेल्या चर्चैत कोल्हापूर प्रेस क्लबचे सदाशिव जाधव , श्रध्दा जोगळेकर , अनिल कानकेकर , संतोष भिंगार्डे , एमएसड्ब्युच्या तनुजा पाटील , गिता मुळे ,तुषार भिवटे आदीनी सहभाग घेतला. सहभागी झालेल्याना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आली. या प्रबोधन कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी विन्स च्या डाँ. प्रभु , के.आर.कोल्हापूरकर सह साईशक्तीचे सागर ठाणेकर , आस्मिता देशपांडे आदीनी विशेष परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment