कोल्हापूर २८: (प्रतिनिधी)
पश्चिम महाराष्ट्रातील आमचे समन्वयक कार्यकर्ते रविंद्र रामचंद्र पोळ यांच्यावर कौटुंबिक न्यायालयाने चुकीच्या माहिती आधारे लादलेली पोटगी रद्द करावी यासाठी हायकोर्ट च्या मार्गदर्शनानुसार आम्ही पुन्हा कोल्हापुरात सदर निकाल दिलेल्य न्यायालयात दाद मागत आहोत, मात्र यास अत्यंत विलंब लागत तो निर्णय लवकर होऊन पोटगी रद्द व्हावी या मागणीसाठी येत्या 8 जानेवारी पासून आम्ही कौटुंबिक न्यायालयासमोर आमरण उपोषण करणार असून आगामी काळात योग्य न्याय मिळण्यासाठी लोकशाही मार्गाने व्यापक आंदोलन करणार आहे अशी माहिती पोटगी बंद आंदोलनाचे संस्थापक समन्वयक अतुल छाजेड ( पुणे ) यांनी आज कोल्हापुरातील दिली. जवाहर नगर येथे राहणारे रवींद्र पोळ यांचे पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर दिनांक 7 मे 2009 रोजी सातारा येथील महिलेशी लग्न झाले. सदर महिला ही चुकीच्या पद्धतीने माहेरी वागत असल्याने आणि पहिल्या दोन मुलांची तसेच वयस्कर वृद्ध सासू-सासर्यांची कोणती जबाबदारी घेत नव्हती आणि तिला संसारात कोणताही रस नसल्याने , दिनांक 22 मे 2014 रोजी न्यायालयाने पहिल्या दिवसापासूनच झालेला हा विवाह रद्द झाल्याचा निकाल वस्तुस्थिती पाहून व वैद्यकीय अहवाल आधारे दिला . त्यानंतर सदर महिला सातारा जिल्हा सहकारी बँकेत मोठ्या पगारावर काम करत असतानाही ही माहिती लपवून ठेवून चुकीची माहिती दिल्याने कौटुंबिक न्यायालयाने रवींद्र पोळ यांना दरमहा तिला तीन हजार रुपयाची पोटगी देण्याचे आदेश गेले आहेत.पोळ कर सल्लागार आहेत पण सध्या जीएसटी लागू झाल्याने त्याची मिळकत अगदीच नाममात्र होत आहे , ती पूर्वी इतकी राहीलेली नाही .तसेच सदर महिलाही जिल्हा सहकारी बँकेतील नोकरीसह पूर्णपणे आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे त्यामुळेच सदर पोरगी रद्द व्हावी आणि रवींद्र पोळ यांना न्याय मिळावा यासाठी आंदोलन करीत आहोत . त्याची सुरुवात 8 जानेवारी रोजी आम्हा दोघांसह सहकारी मित्र - कार्यकर्तै समवेत सीपीआर हाँस्पीटल समोर एक दिवशी लाक्षणिक उपोषणाने होणार आहे या आंदोलनाची पूर्वकल्पना कौटुंबिक न्यायालय तसेच लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन पोलीस स्थानकात देण्यात आली आहे आगामी काळात शांततेत आणि लोकशाही मार्गाने अश्या प्रकरणात नाहकपणे मानसिक व आर्थिक त्रास सहन करावे लागलेल्या अनेकांना संघटित करत आंदोलन व्याप्ती वाढवली जाईल असे ही शेवटी अतुल छाजेड यांनी सांगितले. रवींद्र पोळे घरी नसताना परस्पर त्यांच्या घरी जाऊन वयस्कर लोकांना दमदाटी केल्यानेच याचा धसका घेऊन आपले वडील वारले , या पुढे इतर कोणालाही त्रास देऊ नये व घरी जाऊ नयेच असे आदेशा सदर महिलेस न्यायालय दिल्याचेही रविंद्र पोळ यांनी सांगितले.
Thanks ji
ReplyDelete