नागरिकत्व संशोधन कायदा (CAA) च्या समर्थनात नेशन फस्ट वतीने व्याख्यान आण...



नागरिकत्व संशोधन कायदा (CAA) च्या समर्थनात  नेशन फस्ट वतीने व्याख्यान आणि भव्य रँली

कोल्हापूर  --  " संसदेत नागरिकत्व संशोधन बिल हे मोठ्या बहुमताने मंजूर होऊन त्याचे कायद्यात रूपांतर झाले आहे. काही राष्ट्रविरोधी लोकांचे या कायद्याच्या विरोधात विविध तर्क लावून, गैरसमज पसरवून तरुणांची माथी भडकवण्याचे काम चालू आहे. काही राज्यात समाजकंटक व गुंडांना भडकवून मोठ्या प्रमाणावर जाळपोळ व दंगली घडवून आणल्या जात आहेत.सर्व राष्ट्रभक्त कोल्हापूरवासियांनी    कोणत्याही भुलथापांना बळी पडू नये व कोल्हापुरात शांतता व सौहार्दाचे वातावरण टिकून राहावे यासाठी संयम पाळावा " असे आहवान,ज्येष्ठ विधिज्ञ अँड. प्रवीण देशपांडे यांनी केले. येथील दैवज्ञ बौर्डिग मध्ये त्यांचे व्याख्यान झाले. कायद्याच्या समर्थनार्थ  याःचे आयोजन  " नेशन फर्स्ट " ने केले होते.

या व्याख्यानानंतर दैवज्ञ बौर्डीग  - खरी काँर्नर - बिनखांबी गणेश मंदिर मार्ग ही रँली निवृत्ती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्या येथे पोहचली.येथे डाँ.सुर्यकिरण वाघ यांनी पुष्पहार अर्पण केला.या वेळी  राष्ट्रप्रेमी लोक, देशभक्त कोल्हापूरवासीयांनी भारत माता की जय ,अश्या घोषणा दिल्या.     प्रांरभी दैवज्ञ बौर्डीग येथे संविधान आणि भारतमाता पुजन माजी खासदार धनजंय महाडीक , डाँ.सुर्यकिरण वाघ .अनुजा धरणगांवकर यांनी केले.या नतंर वक्तेअँड. प्रविण देशपांडे यांनी सविस्तर विवेचन केले.यावेळी विहीप चे अँड.रणजितसिंह घाटगे , नगरसेवक अजित ठाणेकर , किरण नकाते , राजाराम शिपुगडे , ऊमा जोशी , माणिकराव पाटील - चुयेकर  , हितेंद्र पटेल ,अँड.रविद्र जोशी , केशव गोवेकर ,

शंशाक देशपांडे , हितेंद्र पटेल , अनिरुध्द कोल्हापूरे , शामराव जोशी , महेश ऊरसाल , सुभाष रामुगडे , अँड.विवेक शुक्ल , संभाजी साळोखे, केदार जोशी , प्रसाद मुजुमदार ,माजी नगरसेवक आर.डी.पाटील  , तानाजी रणदीवे , आप्पा लाड यांच्या सह विविध संस्था - संघटनाचे पदाधिकारी ऊपस्थित होते.

Comments