शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त हृदय विकाराने ग्रस्त जन्मजात शिशूंच्या मोफत शस्त्रक्रिया नोंदणी शिबिर :
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष (कॅबिनेट मंत्री दर्जा) श्री.राजेश क्षीरसागर यांची माहिती
कोल्हापूर दि.२० : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची दि.२३ जानेवारी रोजी जयंती साजरी करण्यात येत आहे. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी तमाम शिवसैनिकांना ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारणाचा मूलमंत्र दिला. त्याच सूत्रानुसार शिवसेना आजपर्यंत काम करीत आली आहे. यामध्ये मोफत अॅम्ब्युलन्स सुविधा, आरोग्य शिबिरे, ग्रंथालये, यासह रक्तदानाचा विश्वविक्रम करणारा शिवसेना हा एकमेव पक्ष आहे. शिवसेनाप्रमुखांचे विचार जोपासून त्यातून प्रेरणा घेत त्यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी राजेश क्षीरसागर फौंडेशन आणि शिवसेना शहर कार्यकारणीच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची दि.२३ जानेवारी २०२० रोजी जयंतीनिमित्त यावर्षी राजेश क्षीरसागर फौंडेशन आणि शिवसेना शहर कार्यकारणीच्या वतीने “हृदय विकाराने ग्रस्त जन्मजात शिशूंच्या मोफत हृदय शस्त्रक्रिया नोंदणी शिबिराचे” आयोजन करण्याचे योजिले आहे. या सामाजिक कार्यातून शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात येणार आहे. या शिबिराअंतर्गत हृदयाला छिद्र असलेल्या लहान मुलांची मोफत तपासणी आणि शस्त्रक्रिया मुंबई, ठाणे स्थित नामांकित रुग्णालयात मोफत करण्याच्या दृष्टीने नाव नोंदणी करण्यात येणार आहे. यासह त्यांना या शस्त्रक्रिया व उपचार पद्धतीबाबत माहिती देण्यात येणार आहे.
लहान मुलांच्या अशा हृदय शस्त्रक्रियांना लाखो रुपयांचा खर्च अपेक्षित असतो. अनेक वेळा आपल्या कमी उत्पनातून इतकी मोठी रक्कम कुठून आणायची असा प्रश्न पालकांना पडतो. पैशापेक्षा मुलाचे प्राण महत्वाचे म्हणून उसनवारी करून, दागदागिने व मालमत्ता गहाण ठेवून पैसे उभे केले जातात. अशा गोरगरीब रुग्णांना दिलासा मिळावा आणि त्यांच्या मुलांना नवजीवन जगता यावे, यासाठी शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त “हृदय विकाराने ग्रस्त जन्मजात शिशूंच्या मोफत हृदय शस्त्रक्रिया नोंदणी शिबिराचे” आयोजन करण्यात आले आहे. शिबिरामध्ये नांव नोंदणी झाल्यानंतर तात्काळ त्यांचे मेडिकल रिपोर्ट तात्काळ मुंबई, ठाणे येथील नामांकित हॉस्पिटला पाठवून मोफत तपासणी व मोफत शस्त्रक्रियेची पुढील प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे, तरी गरजू रुग्णांच्या पालकांनी व नातेवाईकांनी मेडीकल रिपोर्ट व रुग्णाचे आधारकार्ड घेवून दि.२३ जानेवारी २०२० रोजी शिवसेना शहर कार्यालय, शनिवार पेठ, येथे येवून नाव नोंदणी करावी, असे आवाहन *राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष (कॅबिनेट मंत्री दर्जा) श्री.राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.
Comments
Post a Comment