Kolhapur | पुरग्रस्त निलेवाडी पुनरूत्थानकार्य लोकार्पन सोहळा



कोल्हापूर २१: प्रतिनिधी

पश्चिम महाराष्ट्रात महापुराची सर्वाधिक झळ बसलेल्या हातकणंगले तालुक्यातील निलेवाडीकर आज जरी पुरग्रस्त म्हणून विविध वस्तू रूपात मदत स्विकारत असले तरीही भविष्यात मात्र ते नक्कीच आपल्या संघर्षमयवृत्तीने मदत देणारे होतील . असा विश्वास सिद्धगीरी कणेरीमठाचे प . पू . अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी व्यक्त केला . त्याच्या प्रमुख उपस्थितीत दर्बल घटक सबलीकरण आणि आपतकालीन पुनर्वसन क्षेत्रात कार्यरत लुपिन फौडेशनच्यावतीने मंगळवारी दि . २१ जानेवारी रोजी पुनरूत्थानकार्य लोकार्पन सोहळा संपन्न झाला . यावेळी खा . धैर्यशिल माने , आ . विनय कोरे , लुपिनचे कार्यकारी संचालक सिताराम गुप्ता यांच्यासह मान्यवर उपस्थित होते . प्रारंभी सर्वांचे स्वागत अॅड . प्रमोद शिंदे यांनी केले . आपल्या प्रास्ताविकात लुपिन फौंडेशनचे कार्यकारी संचालक सीताराम गुप्ता यांनी गेली तीन महिने प्रत्यक्ष पुरात आणि त्यानंतर शास्त्रशुद्ध सर्वेक्षण करून लुपिनने या निलेवाडी गावातील १२ पुरग्रस्त कुटुंबियांना नवीन घरे , सुपूर्तीसह अंगणवाडी - जिल्हा परिषद शाळा नूतनीकरण , गावाचा पार उभारणे , पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे नूतणीकरण , २६ कुटुंबियांना व्यावसायिक उभारणीसाठी मदत अपंग कुटुंबाना विशेष मदत , औषधे वाटप यासह विविध १२ सेवांची परिपूर्ती केली आहे . भविष्यात ही विविध कामातून हा सामाजिक बांधीलकीचा ऋणानुबंध अधिक घट्ट केला जाईल , असे अभिवचन दिले . यावेळी बोलताना खा . धेर्यशिल माने यांनी निलेवाडीकराशी माझ्या आई आणि आजोबांपासून ते माझ्यापर्यंतच्या तिसऱ्या पिढीतही खासदारपदाच्या विजयात आघाडीच्या मतासह स्नेहबंध कायम आहे . सर्वाधिक झळ पोहचलेले निलेवाडीकर भविष्यात आपल्या कुटुंबातील एक घटक म्हणून जीव धोक्यात घालून आपल्या जनावरानाही सांभाळणार म्हणून ओळखले जातील . भविष्यात ज्यादा पुराची झळ बसू नये यासाठी आपतकालिन नियोजनाचे प्रशिक्षण प्रत्येक निलेवाडीकरांनी घ्यावे तसेच रस्तेही पक्के करावेत यासाठी आपली आग्रही विनंती आहे , असे त्यांनी नमूद केले .वारणा सहकार आणि उद्योग परिवाराशी निलेवाडीकरांचा पिढ्यापिढ्या जबाबदार कुटुंब घटक म्हणून नेहमीच सहभाग राहिला आहे . औषधनिर्मिती क्षेत्रातील लपिनने सामाजिक बांधीलकीतन जपलेला ऋणानुबंध भविष्यात दलक्षित धनगरी वाडी वस्तीपर्यंतही पोहचावा अशी अपेक्षा आ . विनय कोरे यांनी व्यक्त केली . पुणे विभागीय लुपिनचे योगेश प्रभू यांच्यासह अमृता जाधव या विद्यार्थीनीने यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले . या उपक्रमास सदस्या सौ . पुष्पा आळतेकर , कृषी महाविद्यालय पुण्याचे डॉ . आर . डी . घाटगे , विशाल महापुरे , श्रीमती सरितादेवी मोहिते , सुलोचना देशमु , सरपंच वर्षा सुभाष माने , उपसरपंच तानाजी जाधव , ग्रामविकास अधिकारी पी . एन . पाटील , लुपिन फौंडेशनचे व्यंकटेश शेटे , विकास जाधव यांच्यासह ग्रामस्त उपस्थित होते .

Comments