शासनाचा शिवभोजन उपक्रम सुरु
१० रुपयात मिळणार भोजन
कोल्हापूर 27 : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाचा अभिनव उपक्रम शिव भोजन प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कोल्हापुरात सर्वत्र सुरू झाला. याचे वैशिठ्य असं कि फक्त दहा रुपयात गरजू आणि गरीब लोकांकरता सकस दर्जेदार भोजन मिळणार आहे . दुपारी 12 ते 2 या वेळेत उपलब्ध असणार आहे. कोल्हापुरात चार ठिकाणी ही योजना सुरू करण्यात आली आहे. शासनाच्या एका अँपद्वारे गरजूंची नोंदणी होणार असून, अशी नोंदणी करणाऱ्या प्रथम १५० जणांना या भोजनाचा लाभ मिळणार आहे
Comments
Post a Comment