जीवन संघर्षासाठी क्रिकेटसह अवघे क्रीडा विश्व नेहमीच प्रेरणादायी : सुनंदन लेले
कोल्हापूर 06 (प्रतिनिधी) -- जीवन संघर्षौतील जय आणि पराजयाच्या पलिकडे जाऊन अविरतपणे सकारात्मक प्रयत्न करणे यासाठी लागणारी स्थित प्रज्ञता आणि प्रचंड संयम हा क्रिकेट अवघे क्रीडा विश्व नेहमीच शिकवत असते . या प्रतिकूलतेवर मात करून जीवन संघर्षासाठी लढत राहण्यासाठी क्रीडा विश्व हे नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे असे मनोगत जेष्ठ्य क्रीडा समिक्षक सुनंदनन लेले यांनी व्यक्त केले . कोल्हापूर प्रेस क्लब आयोजित पत्रकार दिन आणि गौरव सोहळ्यात ते बोलत होते . अध्यक्षस्थानी महापौर सौ . सूरमंजिरी लाटकर या होत्या तर प्रमुख उपस्थिती गहराज्यमंत्री ( शहर ) सतेज पाटील यांची होती . प्रारंभी सर्वौचे स्वागत अध्यक्ष मोहन मेस्री यानी केले . महापौर सुरमजिरी लाटकर यांनी शुभेच्छा देत मिडीया विश्वाचे स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगरसेकापासून सर्वच लोकप्रतिनिधींना सकारात्मक सहकार्य आणि मार्गदर्शन लाभलेले आहे . भविष्यातही ते लाभत राहो अशा अपेक्षा व्यक्त केल्या . या वेळी मार्गदर्शन करताना गृहराज्यमरी ( शहर ) सतेज पाटील यांनी समाजातील विविध घटकासाठी प्रंसगी आपले कुटुंबाकडे दुर्लक्ष करून कार्यरत असलेल्या पत्रकार बंधूच्या स्वमालकीच्या घरापासून ते त्यांच्या आरोग्यापर्यतच्या विविध गरजापूर्तीसाठी लक्ष देणे गरजेचे आहे . राज्यकर्ते आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या समावेत हे प्रश्न मार्गी लागण्यासाठी आपण आग्रक्रमाने
प्रयत्नशील राहू असे त्यांना मागितले . यावेळी ग्लोबल कोल्हापूर चळवळीचेडाँ.जगन्नाथ पाटील यांना पत्रकार संशोधनासाठी एक रूपये मदतीचा दिलेला धनादेश गुरुबाळ माळी यांच्या हस्ते प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन मेस्री यांचे कडे दिला. कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे महापौर लाटकर याच्या ज्येष्ठ जाहिरात प्रतिनिधी चमकभाई सकारिया सह ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते संजय होमकर सह पत्रकार आणि पोलिसाना चष्मे देणारे रोटरीयन प्रविण कुंभोजकर आदींचा स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. नामदार पाटीलसह जिल्हाधिकारी दौलत देसाई , आयुक्त डाँ. मल्लिनाथ कलशेट्टी याच्या हस्ते विश्वास पानारी , मिथुर राज्याध्यक्ष, विश्वास पानारी आणि संतोष मिठारी यांना प्रेस क्लाब चे या वर्षाचे पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभदा हिरेमठ यांनी केले तर सचिव मंजित भोसले यांनी सर्व मान्यवर पाहुण्यासह राःगोळीकार सुनिता मेंगाणे , अयोध्या हाँटेल चे सचिन शानबाग , शाहू स्मारक व्यवस्थापन सह मान्यवराचे आभार मानले.या सोहळ्यास क्रिकेटअसोशिएशनचे बाळ पाटणकर , वंसत मुळीक , नंदू बामणे , माजी महापौर आर . के . पोवार , डॉ . संदेश कचरे , पद्माकर कापसे , जिल्हा माहिती अधिकारी प्रंशात सातपुते सह विविध क्षेत्रातील मान्यवर ऊपस्थित होते.या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी कार्यौध्यक्ष ऊध्दव गोडसे ,ऊपाध्यक्ष विजय केसरकर , डँनियल काळे , प्रमोद व्हनगुत्ते , राजेंद्र मकोटे , श्रध्दा जोगळेकर , सदाशिव जाधव, संदीप आडनाईक , दिपक घाटगे सह माजी अध्यक्ष भारत चव्हाण यांच्यासह सर्व सदस्य व आजी माजी पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment