2018 मधल्या इरफानच्या शब्दात...

2018 मधल्या इरफानच्या  शब्दात...
(सौजन्य : व्हाट्स ऍप्)


"मी डोळे मिटून शांतपणे फास्ट ट्रेनमध्ये बसलो होतो. अत्यंत वेगाने जाणाऱ्या रेल्वे प्रवासाचा मला आनंद होता... प्रवासामध्ये मी काही स्वप्ने पाहत होतो... माझ्या काही आशा आकांक्षा होत्या... त्या पूर्ण होतील, अशी मला खात्री होती... इतक्यात कोणी तरी माझ्या खांद्यावर हात ठेवला. मी पटकन डोळे उघडले आणि पाहिले तर तो होता टीसी. तो मला म्हणाला... तुमचं उतरण्याचे ठिकाण आलयं..आता उतरा खाली... मी त्याला म्हणालो, मला इथे उतरायचे नाही... पुन्हा पुन्हा टीसीला मी ते सांगितले... पण तोही मला सतत सांगत होता.... हेच तुमचे स्टेशन आहे....!"
"आपल्याला जिथे जायचे आहे, त्याआधीच गाडीतून उतरायला सांगितल्यावर कसे वाटेल...? माझीही अशीच अवस्था झाली आहे... " हे आयुष्याची हतबलता दाखवणारे उद्गार आहेत प्रख्यात हिंदी अभिनेता इरफान खान याचे..! जीवनामध्ये अनिश्चितता हीच केवळ निश्चित असते, असे इरफान खानने ‘टाइम्स आॅफ इंडिया’ला सांगितले आहे...
इरफान सध्या न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमरने आजारी आहे. अतिशय दुर्मीळ व दुर्धर असा हा कॅन्सर. त्यावर तो उपचार घेत आहे.. दुर्मीळ आजार असल्याने डॉक्टरांची औषधोपचारांची दिशाही स्पष्ट नाही.. त्यामुळे त्याच्यावर प्रयोग सुरू आहेत... इरफान म्हणतो.. मी जणू डॉक्टरांच्या प्रयोगाचा एक हिस्साच बनलो आहे...
मी सारी शस्त्रे खाली टाकून आयुष्यापुढे शरणागतीच पत्करली आहे... कॅन्सर झाल्याचे कळल्यामुळे आपले जीवन किती क्षणभंगूर आहे, हे मला पूर्णपणे लक्षात आले आहे... आता मी चिंता करणे बंद केले आहे... पुढच्या दोन वर्षांत वा येत्या काही महिन्यांत काय होणार आहे, हेही मला सांगता येणार नाही..
लॉर्ड्सच्या मैदानावर क्रिकेट पाहायला मिळावे, असे माझे बालपणीचे स्वप्न होते... हॉस्पिटलात शिरताना मला काहीही कळत नव्हते, सुचत नव्हते... तिथेच समोर स्टेडियम दिसले... त्यावर व्हिवियन रिचर्ड्सचे मोठे पोस्टर होते.., पण मला काहीच वाटले नाही त्याचे... जणू याच्याशी आपला संबंधच नाही... इरफान खान म्हणाला...
उपचारांचे काय फलित असेल, कोणास ठाऊक, पण मी या सा-यापुढे शरण आलो आहे,  मला
माहीत असलेल्या, नसलेल्या, ज्यांना ओळखतो, ज्यांना ओळखत नाही, अशा अनेकांनी माझ्यासाठी केलेल्या प्रार्थनेबद्दल, त्यांच्या या सदिच्छांच्या आधारेच मी आज लढत आहे... या सर्व चाहत्यांच्या प्रार्थना व सदिच्छा मला आज लढण्याची ताकद देत आहेत तुम्हा सर्वांचे आभार....!
मला न्यूरोएन्डोक्राइन कॅन्सर आहे. न्यूरोएन्डोक्राइन हा शब्द माझ्यासाठी, माझ्या शब्दभांडारासांठी अगदी नवा आहे, असे इरफान खान सांगतो....!

त्याचा तो झुंजार प्रवास-लढा आता संपलाय... पण त्याला उमगलेलं अंतीम सत्य चिरकाल टिकणार आहे..

मित्रांनो तस तर आपल्या आयुष्यात असा Turn कधी येईल किंवा येणारही नाही..  पण जाणून घ्या, आजचा क्षण हाच शाश्वत आहे.. तोच भरभरुन जगण हेच आपल्या हातात आहे... त्यामुळं उद्याची काळजी.. आँफिसची चिंता.. एकमेकांबरोबरचे वाद.. इगो.. पदाचा नि प्रतिष्ठेचा बेडगी अभिमान.. सार काही सोडून द्या.. जे काही आहे ते आज आहे.. आत्ता.. ते भरभरून मनसोक्त जगा...Yesterday is History.. Tomorrow is Mystery.. Today is a Gift..!! 

Comments