दिव्यांगत्वाच्या निकषानुसार सर्व थॅलेसेमियाग्रस्त रूग्णांना जास्त रेशन धान्य देण्यात यावे.:

दिव्यांगत्वाच्या निकषानुसार सर्व थॅलेसेमियाग्रस्त रूग्णांना जास्त रेशन धान्य देण्यात यावे.. Fight Against Thalassemia Organization च्या वतीने जिल्हा समाजकल्याण अधिकारी दिपक घाटे यांना निवेदन
कोल्हापुर   :२०  प्रतिनिधि 
पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने कालपासून पुणे जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी धान्य किट वाटप सुरू करण्यात आले, त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यात देखील दिव्यांगत्वाच्या प्रकारात येणाऱ्या थॅलेसेमिया आजाराच्या सर्व रूग्णांना सुध्दा निदान रेशन धान्य जास्त देण्यात यावे, या मागणीचे निवेदन आज Fight Against Thalassemia Organization च्या वतीने अध्यक्ष धनंजय नामजोशी व सचिव अभिजीत बुधले यांनी जिल्हा समाजकल्याण अधिकारी श्री. दिपक घाटे यांना दिले
जिल्ह्यात २०० पेक्षा जास्त थॅलेसेमिया रूग्ण असून ६०% पेक्षा जास्त रूग्णांनी अॉनलाईन फॉर्म भरूनही त्यांना अद्याप दिव्यांग प्रमाणपत्र मिळालेले नाही, यामुळे त्यांना कित्येक सुविधांपासून वंचित राहावे लागते, शिवाय थॅलेसेमिया रूग्णांच्या शरीराकडे पाहून त्यांचे दिव्यांगत्वही दिसून येत नाही, यामुळे सुध्दा अनेकदा रूग्णाकडे संशयाने पाहिलं जातं. लॉकडाऊनमुळे थॅलेसेमिया रूग्णांच्या पालकांचेही प्रचंड हाल होतायत, खिशात पैसे नसूनही कुटुंबियांच्या जीवनावश्यक वस्तू धान्य या बरोबरच रूग्णाचे रक्तसंक्रमण, तपासणी आणि इतर औषधे यावर पालकांना महिन्याला एक-दोन हजार रूपये खर्च करावे लागतातंच.
या गोष्टीचा विचार करून थॅलेसेमिया रूग्णांना रेशनवर जास्त धान्य देऊन कुटुंबियांचा खर्चाचा भार हलका करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
त्यावर उत्तर देताना जिल्हा समाजकल्याण अधिकारी दिपक घाटे यांनी सांगितलं की, रेशनवर जास्त धान्य देण्याबद्दल शासनाचा कोणताही आदेश किंवा परिपत्रक नसून दिव्यांगांना जीवनावश्यक वस्तूंसाठी थेट पैसे पोच करण्यात येणार आहेत. पण त्यासाठी रूग्णांकडे दिव्यांग प्रमाणपत्र असणे हे आवश्यक आहे. ज्यांच्याकडे दिव्यांग प्रमाणपत्र आहे त्यांनी महानगरपालिका, ग्रामपंचायत किंवा ग्रामसेवकाकडे नाव व प्रमाणपत्राची नक्कल प्रत द्यावी. त्यानुसार रूग्णाला पैसे पोच केले जातील.
दिपक घाटे यांनी Fight Against Thalassemia Organization च्या वतीने जिल्ह्यातील थॅलेसेमिया रूग्णांना करण्यात येणाऱ्या मदतीबद्दल कौतुक केले, तसेच दिव्यांग प्रमाणपत्र असणाऱ्या रूग्णांना शासनाच्या योजनेची माहिती कळवावी अशी विनंती केली.

Comments