कलावंताना मदतीचा हात

कोरोनाच्या परिस्थितीत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष मा.आम. राजेश क्षीरसागर यांचा कलावंताना मदतीचा हात





कोल्हापूर दि.21 : कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष मा.आम. राजेश क्षीरसागर (कॅबिनेट मंत्री दर्जा) यांच्यातर्फे शहरातील गोरगरीब व गरजू नागरिकांना मदतीचा ओघ सुरु आहे.
कोरोना विषाणूमुळे देशात बेरोजगारी निर्माण झाल्याने कलाकारांची उपासमार होऊ लागली आहे. कलावंत, गायक, वादक, नर्तक हे सर्व कलाकार केवळ त्यांच्या अंगी असलेल्या कलेवरच उदरनिर्वाह करतात. मात्र, गेले महिनाभरापासून कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन असल्याने सर्वच कलावंत रोजगारापासून वंचित आहेत. कोल्हापुरातील कलापथक निर्माता असोसिएशनच्या माध्यमातून स्थानिकांसह देशातील विविध भागातून सुमारे ५०० ते ७०० कलाकार कोल्हापुरात कार्यरत आहेत. परंतु, लॉकडाऊन असल्याने त्यांना कोल्हापुरातच वास्तव्य करावे लागले आहे. सर्वत्र सण, समारंभ, जत्रा, लग्नकार्य रद्द झाल्याने त्यावर अवलंबून असणारे कलाकार बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे या कलाकारांची आणि त्यांच्या कुटुंबियांची अवस्था अंत्यत गंभीर बनली आहे. अशावेळी या कलाकारांना मदतीचा हात म्हणून कर्तव्य आणि सामाजिक भावनेतून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष मा.आम. राजेश क्षीरसागर (कॅबिनेट मंत्री दर्जा) यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले. यामध्ये तांदूळ १०० किलो, तेल २० किलो, गहू १०० किलो, साखर ३० किलो, चहा पावडर १०  किलो, तूरडाळ १० किलो आदी कडधान्य आदींचा समावेश होता.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष मा.आम. राजेश क्षीरसागर (कॅबिनेट मंत्री दर्जा) यांनी कलाकारांची होणारी परवड ओळखून मदतीच्या हाकेला प्रतिसाद देवून तातडीने मदत केल्याबद्दल कलापथक निर्माता असोसिएशन, कोल्हापूरचे अध्यक्ष मुकुंद सुतार यांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष मा.आम. राजेश क्षीरसागर (कॅबिनेट मंत्री दर्जा) यांचे आभार मानले. रंकाळा टॉवर येथील कलापथक निर्माता असोसिएशन, कोल्हापूरच्या कार्यालयात हा मदत वाटपाचा सामाजिक उपक्रम पार पडला.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, उपशहरप्रमुख जयवंत हारुगले, रमेश खाडे, धनाजी कारंडे, हरिभाऊ भोसले, संतोष कांदेकर, अजित कारंडे, योगेश मांडरेकर, राजू कदम, प्रशांत आयरेकर, कलापथक निर्माता असोसिएशन, कोल्हापूरचे रविकुमार सुतार, चंद्रकांत लोहार, प्रकाश सुतार, गोविंद सुतार, झंकार सुतार, गणेश भोसले, अमर कुंभार, पप्पूसिंह रजपूत आदी संघटनेचे कलाकार उपस्थित होते.

Comments