शहरातील रिक्षाचालकांना मदतीचा हात देऊन आमदार चंद्रकांत जाधव यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.आज शिवजयंतीच्या निमित्ताने या उपक्रमाची सुरवात अर्धा शिवाजी पुतळा येथे शिवाजी महाराजांना अभिवादन करून करण्यात आली. साधारणपणे दिवसाला 300 रिक्षाचालक याप्रमाणे पुढील काही दिवसांतच शहराच्या विविध भागातील सर्व रिक्षाचालकांना अशी मदत दिली जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
यावेळी नगरसेवक संभाजी जाधव, इंद्रजित बोंद्रे, विनायक फाळके, योगेश कुलकर्णी, अमित पवार, आशीष पवार, महाराष्ट्र रिक्षाचालक सेनेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, उपाध्यक्ष चंद्रकांत भोसले, विजय गायकवाड, वसंत पाटील, गौरीशंकर पंडित, कपिल ढवण, श्रीकांत माने, नरेंद्र पायमल, दीपक चोरगे यांच्यासह रिक्षाचालकांच्या 17 संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
दरम्यान, यासंबंधी आमदार चंद्रकांत जाधव म्हणाले, लॉकडाऊनमुळे गेले 25 दिवस रिक्षाची चाके एका जागी थांबून आहेत. त्यामुळे उत्पन्न तर नाहीच शिवाय रोजच्या जगण्याचा तर प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे शिवाय रिक्षासाठी घेतलेल्या कर्जाची चिंता त्यांना सतावत आहे. या दृष्टीने त्यांच्या पोटापाण्याची पहिली काळजी दूर करण्याचा या माध्यमातून छोटासा प्रयत्न करीत आहे, तर त्यांच्या इतर अडचणींची सोडवणूक करण्यासाठी राज्य शासनाकडे प्रयत्नशील आहे.
Comments
Post a Comment